📰 MUMBAI MITRA वेध राजकारणाचा!
—–
◆ गोरेगाव दिंडोशीत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नाराज
◆ वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत
—–
नितीन तोरसकर, मुंबई
लोकसभा निवडणुकीत पक्षाने चांगली कामगीरी करुन देखील दिंडोशी व गोरेगाव येथील शिवसेनेत (शिंदे गट) फुटीच्या मार्गावर असुन येथील स्थानिक पदाधिकारी गटा तटाच्या राजकारणामुळे कंटाळले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी गोरेगाव व दिंडोशी विधानसभेत चांगली आघाडी घेतली होती. त्यामुळे वायकर यांना निसटता विजय संपादन करता आला. परंतू आता याच पक्षात फूट पडायची चिन्हे दिसत असुन स्थानिक पदाधिकारी कंटाळले असुन ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणुन देणार असुन त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटात मोठ्या प्रमाणात नाराजी असुन उबाठा मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नविन पक्षाची स्थापना केल्या बरोबर ज्यांनी पहिल्या दिवसापासून पक्ष हिताचे व संघटन बांधणीचे काम प्रामाणिकपणे केले व 100 टक्के योगदान दिल्यानंतर ही पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनात येत आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की पक्षाला जेव्हा गरज होती तेव्हा ह्या कार्यकर्त्यांना राबवून घेतले असल्याचे बोलले जाते. अशी कुजबुज पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.
लोकसभा निवडणुकीत माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी आपला मुलगा व शिवसेना उबाठाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांची वेळोवेळी पक्षाच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे सध्या एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समजते. त्यामुळे त्यांना मानणारे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडे जाणिव पूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे येथील राजकिय परिस्थीती बाबत कळविणार असुन या बाबत मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकार्यांनी बोलताना सांगितले.