📰 *MUMBAI MITRA EXPOSE*
——-
◆मुंबई पोलीस । मुंबई महानगरपालिका । राज्य उत्पादन शुल्क
◆*प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा उत्तम नमुना ‘नशा ऑर्केस्ट्रा’?*
——-
◆ स्टॉप वर्क आर्डर, स्पिकींग ऑडर्र, डिमोलेशन आर्डर तरीसुद्धा बेकायदा बांधकाम उभे राहुन हॉटेल दिमाखात सुरु?
◆बारमध्ये बेकायदेशीररीत्या 22 बारबाला…?
◆‘रक्षक भक्षकांच्या ताटाखालचे मांजर झाले असतील तरी सामान्य नागरीक काय करणार?’
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत पुन्हा एकदा ऑर्केस्टाबारच्या नावाखाली विविध बेकायदेशीर गोष्टींना खत पाणी घातले जाऊ लागल्याचे एकंदरीत चित्र सांताक्रुज परिसरात आहे. मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिकेचा एच/पश्चिम विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाकारतेपणामुळे सांताक्रुज, गजधर बांध रोडला ‘नशा ऑर्केस्ट्रा’ या मे. लोटस रेस्टॉरंट ॲण्ड बार नावे असणाऱ्या हॉटेलकडून प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सरकारी जागेवर वन प्लस वन ‘डान्सबार’ सुरु असल्याचे समजते. रात्री अपरात्रीपर्यंत चालणाऱ्या या बार वर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. मुळात रात्री 12 नंतरच हे बार खऱ्याअर्थाने सुरु होतात अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या बारमध्ये बेकायदेशीररीत्या 22 बारबाला असून अश्लील हावभाव करून गिऱ्हीकांबरोबर जवळीक साधत असल्याचे समजते. ‘रक्षक भक्षकांच्या ताटाखालचे मांजर झाले असतील तरी सामान्य नागरीक काय करणार?’ असा सवाल आता मुंबईकर मुंबई पोलीसांना विचारत आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘नशा ऑर्केस्ट्रा’ या ‘मे. लोटस रेस्टॉरंट ॲण्ड बार’नावे असणाऱ्या हॉटेलच्या बांधकामवर पालिकेकडून दोन वेळा कारवाई करण्यात आली आहे. असे असतानाही पालिकेकडून अग्निशमन दलाचा परवाना देण्यात आलेला आहे. याबाबतीत हॉटेलकडून पालिकेला देण्यात आलेल्या नकाशामध्ये बदल करण्यात आला असून आज हॉटेलला ‘किचन एक्जीट’च नाही आहे.
सांताक्रुज (प.) गजधार बांध रोड सीटीएस क्र. 1053 फोटो पास क्र. एच डब्लयु जी 5-1/सी शॉप क्र. 5 भल्ला मोटर्स येथे तब्बल 1450 स्क्वेअर फुटांचे बांधकामकरुन हॉटेल तयार करण्यात आले असून, बांधकामादरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या एच/पश्चिम विभागाकडून भल्ला मोटर्स मालकास 20 मे 2023 रोजी काम थांबण्याची ‘स्टॉप वर्क’ची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब लक्षात आणून दिली होती परंतू कोणतीच कारवाई झाली नाही. त्यानंतर 6 जून 2023 रोजी ‘स्पिकींग ऑडर्र’कडून दुसऱ्याच दिवशी तोडक कारवाई करण्यात आली तरीही बेकायदा बांधकाम थांबले नाही उलट अधिक जोमाने करण्यात येत होते. त्यानंतर 20 ऑक्टोबर 2023 रोजी ‘डिमोलेशन आर्डर’ इशू करुन त्याच दिवशी बांधकामावर कारवाई करण्यात आली. असे, असतानाही आज हॉटेल पुर्णपणे तयार झाले असून नक्की कारवाई झाली की, कारवाईच्या नावाखाली कागदी घोडे नाचवले गेले असा सवाल आता मुंबईकर विचारत आहेत.
असे असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने जागेची कोणतीही पाहणी न करता परवानगी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाणिवपुर्वक दिर्लक्ष करण्यात आले.
आज या बारमध्ये डान्सबार मालकांकडून मोठ्याप्रमाणात उच्छाद मांडला असून तब्बल 22 बार बाला येथे असून मुंबई पोलीसाकडून जाणिवपुर्वक या हॉटेलकडे दिर्लक्ष केले जात आहे. यामध्ये पोलीसांना मोठ्याप्रमाणात ‘लक्ष्मी’ दर्शन हॉटेल कडून केले जात असल्याचे समजते.
यामुळे सांताक्रुज परिसरातील नागरीकांमध्ये मोठ्याप्रमाणात भितीचे वातावरण पसरले आहे. ‘रक्षक भक्षकांच्या ताटाखालचे मांजर झाले असतील तरी सामान्य नागरीक काय करणार?’ असा सवाल एका नागरीकांने उद्वीग्न हाऊन मुंबई पोलीसांना विचारला आहे. वासनाधीन चेहरे घेऊन निघाणारी येथील गिऱ्हाईके येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना अतिशय वाईट नजरने पाहत असून महिलांनी मोठ्याप्रमाणात मुंबई पोलीसांवर नाराजी नाराजी व्यक्त केली आहे.
डान्सबारवर बंदी आवश्यक आहे. अश्लीलतेला खतपाणी घालणाऱ्या, रोजगाराच्या नावाखाली तरुणाईला बिघडवणाऱ्या मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी सुरु असलेल्या डान्सबारना कायमचे बंद करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
