📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ मुंबईत देर रात डान्सबार?
◆ अनेक बार रात्री 12 नंतरच बार खऱ्याअर्थाने सुरु!
◆ महिलांमध्ये मोठ्याप्रमाणात भितीचे वातावरण
◆ ‘दै. मुंबई मित्र’ची टिम मुंबई व उपनगरांत रोज करणार ‘स्टिंग ऑपरेशन’
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत डान्सबारचे पेव पुन्हा एकदा नव्याने तग धरू लागले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पुन्हा एकदा ऑर्केस्टाबारच्या नावाखाली विविध बेकायदेशीर गोष्टींना खत पाणी घातले जाऊ लागले आहे. मुंबई पोलीसांच्या नाकावर टिच्चून हे बार आज शासनाचे नियम धाब्यावर बसवूण बिनधिक्कतपणे चालू आहेत. रात्री अपरात्रीपर्यंत चालणाऱ्या या विविध बार वर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. मुळात रात्री 12 नंतरच हे बार खऱ्याअर्थाने सुरु होतात अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. काही बारममध्ये बेकायदेशीररीत्या 25 ते 30 बारबाला अश्लील हावभाव करून गिराहीकां बरोबर जवळीक साधत असल्याचे आढळून आले.
काही बार मालकांनी तर महानगरपालिकेच्या सर्व नियमांना केराची टोपली दाखवत बेकायदा बांधकाम केले आहे. डान्सबार मालकांकडून मोठ्याप्रमाणात मुंबई उच्छाद मांडला असून नागरीकांमध्ये मोठ्याप्रमाणात भितीचे वातावरण पसरले आहे. वासनाधीन चेहरे घेऊन निघाणारी येथील गिऱ्हाईके येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना अतिशय वाईट नजरने पाहत असल्याने महिलांनी मोठ्याप्रमाणात याबाबतीत ‘दै. मुंबई मित्र’शी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अधिव्ोशनात सांगितले होते की, आपण एकेकाळी स्वतः 16 डान्सबारविरोधात कारवाई करून बंद केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी मुख्यमंत्र्यांकडे आशेने पाहत आहेत. त्यांचे संसार उध्वस्त करू पाहणारी ही छम छम नावाची कीड पुन्हा एकदा हद्दपार होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडक पावले उचलतील का असा प्रश्न नागरीक विचारात आहेत.
राज्यातील अनिष्ट प्रवृत्ती आणि अनैतिक गोष्टींचा नायनाट करण्याचे धाडस आबा पाटलांनी दाखवून महाराष्ट्रातील जनतेला सरळ मार्गाने जाण्याचा मंत्र दिला. तरुण व अल्पवयीन मुली त्यांना कामधंदा नसल्यामुळे बारमध्ये नाचायला जाऊ लागल्या व त्यांची रोजीरोटी सुरू झाली; नंतर हळूहळू त्यांचा अनैतिक वापर होऊ लागला. वारेमाप पैसा मिळत असल्यामुळे या तरुणी बळी पडू लागल्या. डान्सबारमध्ये माफियांचा वावर, बेटिंगचे अड्डे राजरोसपणे सुरू होते.
असल्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी सरकारने एक योग्य व कठोर पाऊल उचलून डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. बेकार झालेल्या बारबालांपैकी काहींना जरी नोकरीचे साधन उपलब्ध करून दिले असते, तर त्यांना परत बारमध्ये जाण्याची जरुरी भासणार नाही. सामाजिक संघटनांनी आधी या बंदीचे स्वागत केले; पंरतु त्यानंतर त्यांनीही बारबालांच्या उपजीविकेसाठी प्रयत्न केल्याचे दिसले नाही.
डान्सबारवर बंदी आवश्यक आहे. अश्लीलतेला खतपाणी घालणाऱ्या, रोजगाराच्या नावाखाली तरुणाईला बिघडवणाऱ्या मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी सुरु असलेल्या डान्सबारना कायमचे बंद करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय कारवाई करतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
—
कुठले नियम, अटी कायम ठेवल्या आहेत?
* डान्सबारमध्ये अश्लील नृत्य करण्यास परवानगी असणार नाही.
* डान्सबार चालक आणि डान्सबारमध्ये काम कऱणाऱ्या मुलींमध्ये पगाराचा करार असावा.
* डान्सबार संध्याकाळी 6 ते रात्री 11.30 याच व्ोळेत सुरु राहतील.
* डान्सबारमधील तरुणींवर पैसे उधळण्याची परवानगी
* असणार नाही.
—
मुंबई पोलीसांप्रती मोठ्याप्रमाणात नाराजी
मुंबईत पुन्हा वाढत चाललेल्या डान्सबारमुळे मुंबई पोलीसांप्रती नागरीकांनी मोठ्याप्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना पोलीसांना सर्व गोष्टींची माहिती असून त्यांना त्यांचे लक्ष्मीदर्शन झाले की सामान्य नागरीकांच्या समस्यांशी त्यांना काही देण-घेण नाही अशी उद्वीघण होऊन एका महिलेने प्रतिक्रीया ‘दै. मुंबई मित्र’शी बोलताना दिली.
—
मुंबईत पहाटे पर्यंत चालणारे बार?
* बांगुर नगर, गोरेगाव (प.)
* स्नेहा (साई रुखराज), मेहफिल (मिसाईल), चायना गेट
* वनराई, गोरेगाव (पू.)
* तारा (पूजा)
* मालाड (प.)
* मूड, अरुणा (माय क्विन), अशोका, लावण्या दीप (एलडी), स्वागतम्, व्हिपी-9 (एसके मेट्रो)
* कांदिवली पश्चिम
* रंगोली, मेरिडियन, विजय पॅरेडाईस (वीपी9), दावत (महालक्ष्मी), एस 4 यु
* चारकोप कांदिवली
* संध्या, स्टार नाईट (संदेश)
* दिंडोशी
* सोना, मोरया, सोनल, समुद्रा
* समता नगर, कांदिवली पूर्व
* आंचल, नित्यानंद, ललित, सावली
* कस्तुरबा, बोरिवली पूर्व
* आशियाना, क्लब-9, पार्क साइड, कावेरी, सूर संगीत, उत्सव, गुडिया, समर पार्क, चारवॉक 1, चारवॉक 2
* दहिसर पूर्व
* आशिष, संदेश, जयप्रित, गोल्डन पॅलेस, सूरज, गोविंदा, न्यु पार्क साइड, कव्वाली, राज पॅलेस, मीना, समुद्रा, (सिबीआर) चेरंजेवी, शीतल, एम 4 यु
* ओशिवरा
* मेट्रो, नित्यानंद (बॉलीवूड)
* अंबोली अंधेरी (पू.)
* विलास, स्टार इन
* सांताक्रूझ
* लक्ष दीप, स्टार नाईट, लव्हली नाईट, सी बर्ड, क्वीन पॅलेस