📰 MUMBAI MITRA IMPACT
——-
◆ ‘दै मुंबई मित्र’च्या बातमीची वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून दखल
◆ वसईच्या बाफाने येथील ५० हजार चौ.फुटांचे बांधकाम जमीनदोस्त!
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी ‘दै. मुंबई मित्रने वाचा फोडताच खडबडून जागे. झालेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जी प्रभाग समितीमधील बाफाने येथील 50 हजार चौ.फूटाच्या हॉटेलच्या शेडच्या बांधकामावर हातोडा मारत बांधकाम पाडून टाकले. हा “दै मुंबई मित्र“चा इम्पॅक्ट आहे. विस्तृत माहितीनुसार गेले वर्षभर 55 अनधिकृत बांधकाम प्रकरण गाजत असतानाही वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनधिकृत बांधकामे सुरूच आहेत. या अनधिकृत बांधकाम प्रकरणात ‘दै मुंबई मित्र’ने सातत्याने छायाचित्रांसह वाचा फोडली. प्रभाग समिती ‘सी’, ‘एफ’ आणि ‘जी’मधील अनधिकृत बांधकाम प्रकरणी पत्रकार पांडे यांनी दंड थोपटले असून ते उपोषणाला बसणार आहेत.
‘दै.मुंबई मित्र’च्या 9 मे 2023 रोजीच्या अंकात प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग समिती जी मध्ये गेले अनधिकृत बांधकामाचा महापूरच आहे. राष्ट्रीय महामार्गालगत बाफाने येथे रेल्वे पुलाजवळ 50 हजार चौ.फुटांचे पत्रा शेडचे हॉटेलचे बांधकाम करण्यात आले आहे. या अनधिकृत बांधकामांच्या छायाचित्रांसह बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच पत्रकार बी.के. पांडे यांच्या उपोषणाला धडक कामगार युनियचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी जाहीर पाठिंबा दिला. याबाबतचे वृत्त ‘दै. मुंबई मित्र’च्या 9 मे 2023 रोजीच्या अंकात प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग समिती जी मध्ये गेले अनधिकृत बांधकामाचा महापूरच आहे. राष्ट्रीय महामार्गालगत बाफाने येथे रेल्वे पुलाजवळ 50 हजार
चौरसफुटांचे पत्रा शेडचे हॉटेलचे बांधकाम करण्यात आले आहे. या अनधिकृत बांधकामांचे छायाचित्रांसह बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच पत्रकार बी के पांडे यांच्या उपोषणाला धडक कामगार युनियचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी जाहीर पाठिंबा दिला. याबाबतचे वृत्त ‘दै.मुंबई मित्र’ च्या 13 जून 2024 रोजीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले.
यानंतर वसई- विरार शहर महापालिकेला खडबडून जाग आली. प्राप्त माहितीनुसार, वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. या आदेशानंतर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी बाफाने रेल्वे पूला जावळील 50 हजार चौरस फूट बांधकामावर कारवाई केली. हे बांधकाम अक्षरशः जमीनदोस्त करण्यात आले. हा ‘दै. मुंबई मित्र’च्या बातमीचा इम्पॅक्ट आहे. त्याचप्रमाणे पत्रकार पांडे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्याचाही यात वाटा आहे. पत्रकार पांडे यांनी यापूर्वीच सर्व अनधिकृत बांधकाम प्रकरणी 20 जून 2024 पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र शिक्षक मतदार संघाची विधान परिषद निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने पोलीस प्रशासनाने पत्रकार बी.के. पांडे यांना उपोषण न करण्याचा व संबंधित पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला होता. पत्रकार पांडे यांनी पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना पत्रे पाठवून चर्चेची तयारी दर्शवली होती. यासंबंधीचे वृत्तही ‘दै.मुंबई मित्र’ने 20 जून 2024 रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. आचारसंहितेमुळे बी.के.पांडेचे उपोषण तूर्तास स्थगित असे या वृत्ताचे शीर्षक होते. मात्र या वृत्तामध्ये चर्चेतून तोडगा न निघाल्यास आचारसंहिता संपल्यावर 5 जुलै 224 पासून पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशाराही पांडे यांनी दिल्याचा उल्लेख होता.
त्यामुळे रविवार 23 जून 224 रोजी पासून बाफाने येथे केलेल्या पालिकेची कारवाई हा ‘दै. मुंबई मित्र’चे वृत्त आणि पत्रकार पत्रकार पांडे यांच्या उपोषणाचा इशारा यामुळे झाल्याचे मानले जाते. आता पालिका उर्वरित अनधिकृत बांधकामांवर कधी कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
