📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ सर्व्हे क्र 226 हिस्सा 2 गाव मौजे पेल्हारमध्ये भुमाफियांचा हैदोस!
◆ पेल्हारमधील अनधिकृत बांधकामांवर पालिका मेहरबान!
—–
◆ सी प्रभागाचे सहआयुक्त आणि कनिष्ठ अभियंता अक्षय ठाकूर यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष
◆ आयुक्तांचे कारवाईचे आदेश असूनही कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून अद्याप कारवाई नाही!
◆ 175 अनधिकृत बांधकामांना फक्त नोटिसा; कारवाईच्या नावाखाली कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार!
——–
विशेष प्रतिनिधी, वसई
वसई-विरार शहर मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. शिवाय स्वस्त घरे आणि शहरात वाढते व्यवसाय या गोष्टींचा विचार करून जनता वेगवेगळ्या ठिकाणांवरून वसई विरार शहरात वसत चालली आहे. शहराचा सर्वांगीण विकासाच्या हेतूने प्रयत्न करण्यात पालिका आयुक्त अनिल कुमार पवार हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आहेत. जनतेसाठी नवनवीन उपाययोजना करून त्यांनी गेल्या काही दिवसात लोकांची मने जिंकली होती. पण बेकायदा बांधकामे रोखण्यात वसई-विरार महानगरपालिका सपशेल फेल ठरली आहे. वसई-विरार महानगर पालिकेत ‘कुंपनच शेत खातेयं’ अशी परिस्थिती आहे. आयुक्तांकडून वेळोवेळी कारवाईचे आदेश देऊन ही खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या आदेशाला कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद नसल्याचे दिसून येत आहे. आयुक्त सोडता त्यांच्या खालील कर्मचाऱ्यांची फळी भुमाफियांना महापालिका हद्दीतील सर्व जागा आंदण म्हणून देत असल्याचे एकंदरीत चित्र प्रभाग समिती ‘सी’ मध्ये आहे. वसई-विरार महानगरपालिकेच्या नाकावर टिच्चून भुमाफिया प्रभाग समिती ‘सी’ मध्ये बेकायदा बांधकामांचा धुमाकुळ घालत आहेत.
प्रभाग सी हद्दीतील सर्व्हे क्र 226 हिस्सा 2 गाव मौजे पेल्हार, पलशाचा पाडा येथील अनधिकृत बांधकामावर लवकरच कारवाई होणार अशी आश्वासने सी चे सहआयुक्त महेश पाटील आणि कनिष्ठ अभियंता अक्षय ठाकूर यांनी दिली. पण त्यांच्या लवकरच या शब्दाला 2 आठवडे उलटून गेले आहेत. कधी इलेक्शन ड्युटी तर कधी वेळ, बैठका असे बरेच काही बोलण्यात आले. सहआयुक्त महेश पाटील आणि कनिष्ठ अभियंता अक्षय ठाकूर यांचे संबधित बांधकामाच्या विकासकाशी जवळचे संबंध असल्याचे समजते.
वरील भूखंडावरील अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी डेमो स्ट्रक्चर उभे करण्याची कल्पनाही यांच्याकडून देण्यात आली आहे. सहआयुक्त महेश पाटील आणि कनिष्ठ अभियंता अक्षय ठाकूर हे पालिकेचा पगार घेऊन विकासकाची चाकरी करत आहेत. 175 अनधिकृत बांधकामांना फक्त नोटिसा बजावून कारवाई न करण्याचा पराक्रम ‘सी’ च्या अधिकाऱ्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेचा करोडोंचा महसूल बुडाला आहे.
पलशाचा पाडा येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी स्वतः पालिका आयुक्तांनी सी च्या सहआयुक्त महेश पाटील यांना दोन वेळा आदेश प्रस्थापित केले. तरीसुद्धा अजूनही अनधिकृत बांधकामाच्या एक विटेलाही धक्का लागलेला नाही. पालिका आयुक्तांना गृहीत धरून स्वतःचा मनमानी कारभार सहआयुक्त महेश पाटील करत असल्याचे दिसून येत आहे. आयुक्तांनी बजावूनसुद्धा कारवाई साठी बहाणे देणे हे कनिष्ठ अधिकारी सरोसर आयुक्तांच्या आदेशांचे उलघणं केल्यासारखे आहे.
त्यामुळे आयुक्तांनी स्वतः हा विषय गंभीरपणे घेऊन यावर विशेष लक्ष द्यावे आणि आपल्या आदेशाचा अपमान करणाऱ्यां सहआयुक्त
महेश पाटील आणि कनिष्ठ अभियंता अक्षय ठाकूर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्यात यावे. अशी मागणी नागरीकांकडून होत आहे. आयुक्त याबाबतीत निर्णय घेऊन जनतेच्या मनात पुन्हा आपली जागा निर्माण करतील अशी
अपेक्षा जनमानसात आहे.
=====
अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात आमरण उपोषणाचा इशारा!
मनपा प्रशासनात वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा पत्राची योग्य ती दखल मनपा प्रशासन घेत नाही आहेत. वेळो वेळी पत्राला केराची टोपली हे अधिकारी दाखवत आहेत. आज जवळ जवळ एक वर्ष उलटूनही मनपा प्रशासनात दिलेल्या पत्रावर कोणतीही प्रशासनातर्फे कार्यवाही करण्यात आलेली नाही. वेळोवेळी अनधिकृत बांधकामांविषयी पत्रव्यवहार केला असून पालिका प्रशासनातील मुजोर अधिकारी त्या पत्राला केराची टोपली दाखवत आहेत. असा आरोप पत्राच्यामाध्यमातून पत्रकार बि. के. पांडे यांनी केला आहे. यावेळी पत्रात त्यांनी माझ्या सारख्याची ही अवस्था असेल तर सामान्य नागरिकांची काय अवस्था आहे. हे यावरून दिसून येत आहे. असे यावेळी ते म्हणाले. त्यामुळे 18 जून 2024 पासून बी. के. पांडे आमरण उपोषणास मनपा मुख्य कार्यालय, विरार येथे बसणार आहेत. तशा आशयाचे परवानगीचे पत्र त्यांनी पोलीस प्रशासनास दिले आहे.
