📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
◆ पंतप्रधानपदाची “हॅटट्रीक” मैं, नरेंद्र दामोदरदास मोदी…
◆ ३० कॅबिनेट मंत्री, ५ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ!
◆ मोदी सरकार ३.० पर्वाला सुरुवात; मंत्रिमंडळात दिग्गजांचा समावेश
——–
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
2014, 2019 आणि आता 2024 अशी सलग तिसऱ्यांदा मोदी 3.0 च्या पर्वाला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदींनी काल सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. “मी नरेंद्र दामोदर दास मोदी“ असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा गोपनीयतेची शपथ घेतली. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी देशभरातून आणि जगभरातून पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील 71 मंत्र्यांनी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 72 वे मंत्री म्हणून शपथ घेतली. मोदी 3.0 कॅबिनेटमध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 36 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.
नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्यासोबत एनडीएच्या काही दिग्गज नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जेपी नड्डा, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांचा समावेश आहे. भाजप नेते अमित शहा यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वीच्या सरकारमध्ये अमित शहा केंद्रीय गृहमंत्री होते. ते चार वेळा गुजरातचे आमदार होते. गांधीनगर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार झाले. राजनाथ सिंह यांनी मोदी 3.0 कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. राजनाथ सिंह मागील सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते. ते लखनौचे नवनिर्वाचित खासदार आहेत.
मोदींच्या कॅबिनेट मध्ये राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जे.पी.नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारामण, कुमारस्वामी, मनोहर लाल खट्टर, डॉ. एस. जयशंकर, धर्मेंद्र प्रधान, जीतन राम मांझी, राजीव रंजन सिंह, पीयुष गोयल, सर्वानंद सोनोवाल, डॉ.वीरेंद्र कुमार, के राममोहन नायडू, वीरेंद्र खटीक, ज्योतिरादित्य शिंदे, अश्विनी वैष्णव, गिरीराज सिंह, जुएल ओराम, भुपेंद्र यादव, हरदीप सिंह पुरी, किरेन रिजुजू, गजेंद्र सिंह शिखावत, अन्नपूर्णा देवी, चिराग पासवान, गंगापूरम किशन रेड्डी, डॉ. मनसुख मांडविया, सी आर पाटील या 30 मंत्र्यांनी शपथ घेतली.
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), राव इंद्रजित सिंह, डॉ. जितेंद्र सिंह, अर्जून राम मेघवाल, प्रतापराव जाधव, जयंत चौधरी या 5 मंत्र्यांनी शपथ घेतली तर, राज्यमंत्री मंत्री म्हणून जितीन प्रसाद, श्रीपाद नाईक, पकंज चौधरी, श्रीकृष्ण पाल, रामदास आठवले, रामनाथ ठाकूर, नित्यानंद राय, अनुप्रिया पटेल, व्ही. सोमण्णा, चंद्रशेखर प्रेमासानी, एसपी सिंह बघेल, शोभा करंलाजे, कीर्तिवर्धन सिंह, बीएल वर्मा, शांतनू ठाकूर, सुरेश गोपी, एल मुरुगन, अजय टम्टा, बंडी संजय कुमार, कमलेश पासवान, भागीरथ चौधरी, सतीशचंद्र दुबे, संजय शेठ, रवनीत सिंग, दुर्गादास ऊईके, रक्षा खडसे, सुखांता मजुमदार, सावित्री ठाकूर, तोखन साहू, राज भूषण चौधरी, भूपती राजू, श्रीनिवास वर्मा, हर्ष मल्होत्रा, निमुबेन बामनिया मुरलीधर मोहोळ या 36 मंत्र्यांनी शपथ घेतली.
भाजप नेते आणि नवनिर्वाचित खासदार नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. गडकरी हे मोदींच्या मागील दोन्ही सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. निर्मला सीतारामन यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. एस जयशंकर यांनी नवीन सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मोदी 3.0 कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली.
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शेजारील देश आणि इतर देशांतील अनेक नेते सामील झाले होते. यात श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, नेपाळचे पंतप्रधान पुष्पाजी. कमल दहल प्रचंड, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांनी उपस्थिती लावली होती. तसेच भारतातील अनेक दिग्गजांनीही या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यात सुपरस्टार रजनीकांत, गौतम अदानी,राजनाथ सिंह, कंगना रणौत यांच्यासह अनेकांनी याप्रसंगी उपस्थिती लावली होती.