📰 MUMBAI MITRA वेध निवडणुकीचा!
——-
◆ मुंबईत महायुतीचे किमान 17 तर कमाल 24 आमदार निवडून येणार?
◆ मुंबईतील एकूण 36 जागांपैकी 24 जागांवर घवघवीत यश मिळण्याची शक्यता
◆ 7 विधानसभा क्षेत्रांमध्ये महायुतीचे उमेदवार अवघ्या काही हजार मतधिक्याच्या फरकाने पराभूत
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील एकूण सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये गेल्या निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा भाजप प्रणित महायुतीला यंदाच्या म्हणजे 2024 च्या निवडणुकीत अवघ्या दोन जागा मिळवता आल्या. यामध्ये उत्तर मुंबईमध्ये महायुतीचे पियुष गोयल यांनी दणदणीत विजय मिळवला तर उत्तर पश्चिम मुंबई रवींद्र वायकर यांच्या 48 मतांनी निसटता विजय झाला. त्यामुळे मुंबई काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या वर चष्मा दिसत असला तरी विधानसभा मतदारसंघात महायुतीला मिळालेली मते पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत 17 आमदार मुंबईतुन जिंकणे सहज शक्य आहे.
7 विधानसभा क्षेत्रांमध्ये महायुतीचे उमेदवार अवघ्या 1 ते 4 हजार मतधिकाऱ्यांच्या फरकाने पराभूत झाले. त्यामुळे येथे जरा जास्त लक्ष घातले तर महायुतीला मुंबईतील एकूण 36 जागांपैकी 24 जागांवर घवघवीत यश मिळु शकेल. मुंबईत उपनगरांमध्ये लोकसभेच्या सहा तर विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. 2024 लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सहा पैकी चार जागा जिंकल्या. महाविकास आघाडी मध्ये सामील असलेल्या शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई आणि शनी मुंबई अशा तीन लोकसभा जागांवर विजय मिळवला तर उत्तर मध्य मुंबईमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला अशा प्रकारे महाविकास आघाडीला मुंबईतील एकूण चार लोकसभेच्या जागांवर विजय प्राप्त झाला, महायुतीला केवळ उत्तर मुंबई आणि उत्तर पश्चिम मतदार संघामध्ये विजय मिळवता आला. दोन लोकसभेच्या जागा मिळाल्याने आघाडीचे मुंबईत वर्चस्व दिसत आहे मात्र हे चित्र लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आहे विधानसभा मतदारसंघातून महायुतीला मिळालेली मते पाहता वेगळे चित्र पाहायला मिळते….3/
लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघांमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत मुंबईतील सहा लोकसभाक्षेत्रात एकूण 36 विधानसभा मतदार संघ आहेत. मुंबईतील 36 विधानसभा अर्थात आमदारकी क्षेत्रात महायुतीला पडलेल्या मतांचे विश्लेषण केले तर आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती दोन तृतीयांश जागा जिंकू शकते.
तपशील मुंबईमध्ये शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) यामिनी जाधव यांचा 52 हजार 444 मतांनी पराभव केला, खासदारकीची हॅट्रिक करण्याचा अरविंद सावंत यांना 3,93,735 मते मिळाली तर यामिनी जाधव यांना तीन लाख 41 हजार 291 मते पडली. या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या मुंबादेवी भायखळा शिर्डी वरळी या विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीला साथ मिळाली तर कुलाबा आणि मलबार हिल विधासभेत महायुतीला एकतर्फी मते पाडले त्यामुळे इथून नाही तुझे दोन आमदार सहज जिंकून येतील.
दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवसेनेचे (ठाकरे गट) अनिल अनिल देसाई यांनी शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा 44 हजार 434 मतांनी पराभव केला यापैकी अनुशक्ती नगर धारावी आणि सायन कोळीवाडा या विधानसभा क्षेत्रात आघाडीला मतदारांची बरी साथ मिळाली. वडाळा आणि माहीम विधानसभेत युतीला अतिशय उत्तम मते मिळाली आहेत तर चेंबूर विधानसभा अवघ्या तीन हजार मतांचा फरक आहे. त्यामुळे या लोकसभा मतदार संघ युतीचे 3 आमदार जिंकायला जास्त प्रयास करावे लागणार नाहीत.
ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील यांनी भाजपचे मिहीर कोठेचा यांचा 29 हजार चोवीस मतांनी पराभव केला. संजय पाटील यांना चार लाख 48 हजार 615 एवढा तर मिहीर कोटेच्या यांचा 4 लाख 19 हजार 581 मते मिळाली. त्या लोकसभा क्षेत्रातील मुलुंड आणि घाटकोपर या दोन विधानसभेत महायुतीला मिळालेली मते आणि मविआला मिळालेली मते यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी युतीचे आमदार जिंकून येऊ शकतात. त्याचप्रमाणे भांडुप मतदार संघात युतीने प्रयत्न केल्यास तिसरा आमदारही जिंकून येऊ शकतो. विक्रोळी घाटकोपर पश्चिम आणि मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभा मतदार संघ पूर्णपणे आघाडीकडे झुकल्याचे स्पष्ट होते.
उत्तर मुंबईमध्ये भाजपचे पियुष गोयल यांनी काँग्रेसचे भूषण पाटील यांचा 3 लाख 56 हजार 996 त्यांनी पराभव केला पियुष गोयल त्यांना लक्षणीय सहा लाख 78 हजार 451 मते मिळाली तर भूषण पाटील यांना 3 लाख 21 हजार 455 एवढीच मते मिळाली. उत्तर मुंबईतील बोरिवली दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व चारकोप या विधानसभा क्षेत्रात महायुतीचा उमेदवार जिंकेल एवढा मोठे मताधिक्य पियुष गोयल यांना मिळाले. आहे मालाड पश्चिम मतदारसंघात ही गोयल यांच्या पेक्षा भूषन पाटील यांना एक हजारपेक्षाही कमी मताधिक्य मिळाले. त्यामुळे युतीने प्रयत्न वाढविण्यास येथे 6 पैकी 6 आमदार युतीचे जिंकून येउ शकतात.
उत्तर मध्य मुंबईमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी शिंदे गटाचे उज्वल निकम यांचा 16 हजार 713 मतांनी पराभव केला . वर्षा गायकवाड यांना 4 लाख 44हजार 100 तर उज्वल निकम यांना 4 लाख 27 हजार 387 मते मिळाली यातील विलेपार्ले आणी बांद्रे पश्चिम मतदार संघात महायुतीला चांगली मते मिळाली.त्याचबरोबर चांदीवली, कलीना,विधानसभा क्षेत्रात आघाडी आणि युतींच्या मतांमध्ये जास्त फरक नाही .त्यामुळे विलेपार्ले बांद्रे पश्चिम या मतदारसंघसह कांदिवली आणि कलिना विधानसभातही युतिचे आमदार निवडून येउ शकतात.
उत्तर पश्चिम मतदार संघांमध्ये शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला. मात्र ही झुंज अतिशय अतितटीची आणि गुंतागुंतीची झाली.
