📰 Mumbai Mitra Exclusive
——
◆ ‘एक कॉल मॅटर सॉल’
——
◆ मालवणी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल
◆आयुषी मानले धडक कामगार युनियनचे आभार
——
विशेष प्रतिनिधी, मुंबई
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी ‘एक कॉल मॅटर सॉल्व’ हा आपला बाणा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. वेब सिरीज चित्रिकरणादरम्यान, गळ्यातील दागिने गहाळ झाल्याची तक्रार करण्यासाठी एक अभिनेत्री मालवणी पोलीस ठाण्याच्या चकरा मारत होती. परंतु पोलीस स्टेशन तक्रार घेण्यास टाळाटाळ करत होते. अखेर तिने धडक कार्यालय गाठले. त्यावेळी अभिजीत राणे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने दखल घेत मालवणी पोलीस ठाण्याला तक्रार दाखल करून घ्यायला भाग पाडले. सदर अभिनेत्रीने अभिजीत राणे यांचे याबाबत आभार मानले.
प्राप्त माहितीनुसार, मालाड पालिकेतील कल्याण नगर येथे राहणारी सीने अभिनेत्री आयुषी जैस्वाल 6 मे 2024 रोजी एका वेब सिरीज चित्रीकरणासाठी कुमारविला मड आयलंड, मालाड पश्चिम येथे गेली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ती आपले कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूममध्ये गेली असता, तिच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याची चैन आणि एक तोळ्याचे सोन्याचे पेंडंड गहाळ झाल्याचे आढळून आले. सुमारे 60 हजार रुपये किमतीचे दागिने हरवल्याने बेचैन झालेल्या अभिनेत्रीने संपूर्ण स्टुडिओत शोध घेतला. सर्वांकडे विचारणा केली परंतु तिला ते सापडले नाही. त्यामुळे तिने मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करायचे ठरवले. परंतू, मालवणी पोलीस ठाण्याच्या चकरा मारूनही पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही. अभिजीत राणे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने दखल घेत मालवणी पोलीस ठाण्याला तक्रार दाखल करून घ्यायला भाग पाडले.
याबाबतीत मालवणी पोलीस ठाण्यात कलम 379 अंतर्गत अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, 10 ग्रॅम वजनाचे गणपतीचे सोन्याचे पेंडंड ज्याची बाजार किंमत 35 हजार व 5 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व डायमंड पेंडंड ज्याची बाजार किंमत 25 हजार असून त्याची नोंद गुन्ह्यात केली आहे.
आयुषी जैस्वाल यांनी याबाबतीत बोलताना, मी अनेक दिवस पोलीस ठाण्याच्या चकरा मारत होते. परंतु मला न्याय मिळत नव्हता. अभिजीत राणे यांना ज्यादिवशी माझ्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तेव्हा त्यांनी तात्काळ याबाबतीत लक्ष घातले. आज जो मला न्याय मिळालेला आहे. त्याचे संपूर्ण श्रेय मी अभिजीत राणे यांना देते.
अभिजीत राणे यांनी याबाबतीत बोलताना, धडक कामगार युनियन ही तळागाळातील प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय कशाप्रकारे मिळवून देता येईल यासाठी कायमच प्रयत्नशील असते. धडक कामगार युनियन महासंघांतर्गत येणारी धडक ऑल फिल्म कामगार संघटनेच्या माध्यमातून आम्ही फिल्म क्षेत्रात हातावर काम करण्याऱ्या प्रत्येक कामगाराचे प्रतिनिधित्व करतो. अनेक वेळा कामगारांना काम करून सुध्दाही त्याचा योग्य मोबदला दिला जात नाही. तसेच अनेक वेळा कामगारांना काम करत असताना त्यांच्या सुरक्षेततेची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे अनेक वेळा दुर्घटना होतात. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी युनियनकडे येत असतात. याबाबतीत आम्ही लवकरच राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याबाबतीत नियम तयार करण्यासंदर्भात विनंती करणार आहोत. असे यावेळी ते म्हणाले.
