📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
◆ हजारो कामगारांच्या उपस्थितीत…
◆ धडक सोहळा उत्साहात संपन्न!
◆ मराठी व हिंदी साहित्य क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्यांचा ‘धडक सन्मान 2024′ देऊन सत्कार
◆ कामगार क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्यांना ‘धडक एक्सलन्सी अवॉर्ड 2024′ देऊन सन्मान
◆ साहित्यिक, लेखक, कलाकार, कामगार व राजकीय प्रतिष्ठीत पाहुण्याची कार्यक्रमास मांदियाळी
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
1 मे या महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिना निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही धडक कामगार युनियन महासंघातर्फे भव्य कार्यक्रम गोरेगाव (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला होता. राजकीय क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सिने अभिनेता, अभिनेत्री, सोशल मीडिया स्टार व हजारो कामगार यांच्या उपस्थितीने गाजलेल्या या रंगतदार कार्यक्रमात मराठी हिंदी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ कवी लेखक, पत्रकार यांना धडक सन्मान 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धडक कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिन कामगार दिनाचे औचित्य साधत धडक कामगार युनियन महासंघातर्फे दरवर्षी भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी ही गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलोनीत धडक च्या कार्यालयासमोरील प्रांगणात रंगतदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाराष्ट्राची लोकधारा हा राज्याच्या संस्कृती चे दर्शन घडवणाऱ्या मनोरंजक कार्यक्रमाचा हजारो कामगारांनी आपल्या कुटुंबासह आनंद लुटला यावेळी सत्यनारायणाची महापूजा व कामगारांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
भाजपचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी व ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बोरिवली विधानसभेचे आमदार भाजपचे मुंबई प्रदेश सरचिटणीस सुनिल राणे तर विशेष अतिथी म्हणुन ‘दै. मुंबई मित्र’च्या संपादिका अनघा राणे, प्रसिध्द गीतकार दिलीप सेन, दै. मुंबई मित्रचे राजकीय संपादक अशोक राणे, वास्ट मिडीया नेटवर्क प्रा. लि चे सिईओ अमोल राणे, प्रसिध्द महिती अधिकार कार्यकर्ते अनील गलगली आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामराठी – हिंदी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ कवी, पत्रकार, लेखक यांचा धडक सन्मान 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झुनझुन वाला महाविद्यालयाचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र सिंग यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले हे पुरस्कार मराठीतील ज्येष्ठ पत्रकार लेखक यांना प्रदान करण्यात आले त्याचप्रमाणे हिंदी साहित्यातील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मराठी साहित्यात व पत्रकारीतेत विजय वैद्य (ज्येष्ठ पत्रकार, दै. मुंबई मित्र), राजेश पुरंदरे (ज्येष्ठ पत्रकार), योगेश त्रिवेदी (ज्येष्ठ पत्रकार), नितीन विजय तोरसकर (पत्रकार, दै. मुंबई मित्र), संजय भैरे (संपादक, अक्रॉस मुंबई व निर्माता, सोहम, मराठी चित्रपट), अविनाश पांडुरंग जाधव (पोलीस निरीक्षक, विशेष शाखा 1 गुन्हे अन्वेषण विभाग, परिमंडळ 9, मुंबई), सिताराम मेस्त्री (कला दिग्दर्शक), भुषण तांबे (कवी/लेखक/पत्रकार) यांना ‘धडक सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ओम व्यास (संगीत), सैयद सलमान (पत्रकारिता), गीतकार हरिश्चंद्र (साहित्य), अमित कुमार (पत्रकारिता), सचिन विद्रोही (अभिनय), शिखा गोस्वामी (कविता), जयप्रकाश सोनकर (कविता), वंदना कदम (लेखन), मुरलीधर पांडेय (साहित्य), हीरेन्द्र झा (लेखन), जिज्ञासा पटेल (साहित्य), गजानन महतपुरकर (लेखन), दीनदयाल मुरारका (लेखन), एल. एस. यादव ‘लल्लन’ (पत्रकारिता), पवन सक्सेना ( लेखन), शुभम तिवारी (टीवी पत्रकारिता), अनिल कुमार ‘राही’ (काव्य), त्रिलोचन सिंह अरोड़ा (लेखन) आदींना हिंदी साहित्यात दिलेल्या विशेष योगदानाबद्दल ‘धडक सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘धडक कामगार युनियन महासंघात सामील असलेल्या विविध कामगार युनियनमध्ये विविध माध्यमातून विशेष योगदान देणाऱ्यांना धडक एक्सएलेंसी अवॉर्ड 2024 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्यामध्ये काकाली भट्टाचार्य (मेघानी) (कॉस्मेटोलॉजिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्ट) मालक – “काक सलून“, आर्लेन विन्स्टन परेरा( ब्लेस इसेन्स), फरीदा सरोशियन (फिड्रा प्रोडक्ट्स ), ॲड. नीना शेट्टी (मिस्टिकल सोल लाईव्ह ), शिवानी आर झवेरी(शिवानी झवेरी गारमेंट्स),आबिद अली बेग(अध्यक्ष,कलाम फाउंडेशन ),फुरकान शेख(सचिव,कलाम फाउंडेशन), रियाझ शेख (खजिनदार कलाम फाउंडेशन), अनु कपूर (संस्थापक – “चोकोपर्ल“) मनीषा शेखर अस्थाना (मालक – “कर्म टेरा“) सीमा त्रिवेदी (संस्थापक – “अप्राइज ग्रो“) देबजानी अमेय साळवी (मालक – आराध्या लॉजिस्टिक ) अर्चना शहा (आहारतज्ञ + संख्याशास्त्रज्ञ लोगो डिझायनर,स्वाक्षरी आणि व्हिजिटिंग कार्ड सल्लागार), सचिता कोठारी (फॅशन डिझायनर) “सचिता क्रिएशन्स“, अमी मेहता (संस्थापक,रायजिंग एनर्जी), अमृता मिश्रा (बी बोल्ड वुमन फाउंडेशन,संस्थापक), दिप्ती व्होरा (आंतरराष्ट्रीय आणि सेलिब्रिटी फॅशन आणि नृत्यदिग्दर्शक), सबा खान (संस्थापक, एसएस मास्टर मेकअप), अँकर खुशबू (उपसंपादक, उज्ज्वल भारत समाचार), गंगेश्वरलाल ए. श्रीवास्तव (कार्यकारी संपादक, शक्ती जनहित मंच वृत्तपत्र), बी एन तिवारी(अध्यक्ष, एफडबल्युआयसी), अशोक दुबे (ऑल इंडिया फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन, राष्ट्रीय अध्यक्ष), अखिलेश सिंग (फिल्मोरा मीडिया नेटवर्क आणि डीपीआयटीए), जयश्री रविशंकर (असोसिएशन ऑफ सिने अँड टीव्ही इक्विपमेंट सप्लायर्स), रवी बनसोडे (मुंबई सचिव, धडक कामगार युनियन), बबन आगडे (मुंबई उपाध्यक्ष,धडक कामगार युनियन), पंकज कालरा (अभिनेता), रेखा कालरा, सत्यविजय सावंत (युनिट अध्यक्ष, हसमुख आणि कंपनी (पीजी)), चैताली चॅटर्जी ( वि संस्था,अध्यक्ष ), नितीन खेतले (मॅनेजर, वास्ट मिडीया नेटवर्क प्रा. लि.), नाझ राबिया खान (स्टंट वुमन), मुस्कान मदिना सय्यद (स्टंट वुमन), मुस्ताक काशेम अली, नूर हसन कुरेशी, दिपेश डी. शहा, हसनैन खान, हरी आर.घोष, रफिक शेख, उमेश तुकाराम कुबल, संजय सिंग, मोहम्मद बिलाल तन्वीर खान, अफजल पी चांदीवाला (लिविंग इन स्टाईल, संस्थापक मालक, लक्झरी फर्निचर शोरूम, गोरेगाव, मुंबई), राजकरण तिवारी (राष्ट्रीय अध्यक्ष, संयुक्त व्यापार मंडळ, अखिल भारतीय व्यापारी संघटना, राष्ट्रीय अध्यक्ष), रितू चौहान (अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या), जय ठक्कर (फॅशन स्टायलिस्ट,गरबा किंग, अंकशास्त्रज्ञ), कस्तुरी दिनेश गडा, सुनील वाघमोडे (वेब एडिटर, दैनिक मुंबई मित्र), शिबा शेख (अभिनेत्री आणि मॉडेल, शिबा मीडिया वर्क, संस्थापक), गणेश शाहू (शिबा मीडिया वर्क, संस्थापक), विजया चांडक (नेचरसल्म कंपनी, मालक), शिवम दीक्षित (प्रोजेक्ट हेड, इम्ली सिरियल, फोर लायन्स फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड), शमसुद्दीन खान (सरचिटणीस, बहुजन महापार्टी), उत्तम कुमार (महाराष्ट्र प्रदेश संयोजक, केरळ प्रकोष्ट भाजपा), गोपी डेकोरेटर, संतोष यादव (सामाजिक कार्यकर्ता), रुपलाल यादव, अर्जुन महादळकर (वितरण प्रमुख, दैनिक मुंबई मित्र), सचिन महाडिक (वितरण प्रमुख, दैनिक मुंबई मित्र), मनीष सुरेश महाराज (खाटू श्याम), उपेंद्र पंडित (संपादक, दैनिक मुंबई अमरदीप), फरीद शेख (मुंबई उपाध्यक्ष, धडक जनरल माथाडी कामगार युनियन), जसबीर खरवार (कास्टिंग डायरेक्टर), काजल राजपूत (मॉडेल), दिव्यांशी दे (अभिनेत्री), निहारिका शर्मा (अभिनेत्री), इनाया सिरोही (मॉडेल), पूनम राय (अभिनेत्री), सना शेख (अभिनेत्री), संजना सिल्क (आयटम क्वीन), वच्छलाबाई अपंग सेवा संस्था, मोहसीन शेख (पत्रकार), प्रहवी पाठक (मॉडेल ), कॅरेन टेरी रझा (फॅशन मॉडेल, मोटिव्हेशनल स्पीकर), नीलम तेली (जैन) (संस्थापक, शांती सेवा फाउंडेशन, पूजा तिवारी (मॉडेल, अभिनेत्री), सायरा सत्तानी (उपाध्यक्ष, धडक कामगार युनियन (महिला शाखा)),शैलेश पटेल (मुंबई रफ्तार न्यूज), मोनिका सोनी (संस्थापक – एमजे पुरस्कार आणि कार्यक्रम ), शीला शर्मा ((संस्थापक व अध्यक्ष – कला संस्कृती फाउंडेशन), अजय दुबे (राष्ट्रीय अध्यक्ष – बेटी बचाओ बेटी पढाओ चॅरिटेबल ट्रस्ट), कल्याणजी जाना (संस्थापक आणि अध्यक्ष दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म्स ऑर्गनायझेशन), जिग्गन्ना देसाई (संस्थापक – एनजीओ गुरुकुल फाउंडेशन) रक्षिका शर्मा (अभिनेत्री आणि मॉडेल), लक्ष्मी माधरी ( रिच मीडिया एंटरटेनमेंट), करिश्मा राव (अभिनेत्रीं) यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लेज्ली त्रिपाटी यांनी केले तर धडक सन्मान सोहळ्याचे सुत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार राजेश विक्रांत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडक कामगार युनियनच्या मनिषा यादव, आरती सावंत, अभय जहा, विकी परेरा, रोहीत गुडेकर आदींनी विशेष मेहनत घेतली. निसर्गाच्या सानिध्यात रंगलेल्या या अभूतपूर्व सोहळ्याच्या सुखद आठवणी मनात साठवत सर्व उपस्थित परतले.