📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ विद्यार्थ्यांना एमडी विकणाऱ्या महिलेला अटक
◆ साडेपाच लाखाचे ड्रग्ज जप्त
◆ टिळकनगर पोलिसांची कारवाई
——–
विशेष प्रतिनिधी, डोंबिवली
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्स विरोधी कारवाईच्या निर्देशानंतर महाराष्ट्रात मोठ्यप्रमाणात पोलीस प्रशासनाकडून राज्यभरात कारवाई होत आहे. ठाणे शहर पोलीसांकडूनही याबाबतीत मोठ्याप्रमाणात कारवाई होत आहे. अशी एक मोठी कारवाई टिळकनगर पोलिसांकडून करण्यात आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोर्फिन ड्र्ग्ज विकणाऱ्या महिलेला अटक करून गजाजाड केले आहे. महिलेला रंगेहात पकडण्याकरीता पोलिसांनी एक पथक नेमले होते. अटक महिलेला ड्रग्ज कोणाकडून पुरविले जात होते? किती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महिलेने लक्ष्य केले आहे याचा पोलीस तपास करीत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली महिला सलमा शेख कल्याण पुर्वेतील हनुमान नगर येथे राहत असून तिच्यावर पोलिसांनी जवळपास एक महिना एका शाळेच्या छतावर बसून पाळत ठेवली होती. सलमाला ड्र्ग्ज विकताना डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी अटक केली.
2015 साली सलमा हिला पोलिसांनी अटक केली होती. सलमा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकत असल्याची माहिती टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ट पोलिस निरिक्षक विजय कदम यांना मिळाली होती. याची माहिती कदम यांनी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनील कुराडे यांना दिली होती. पोलिस अधिकारी मोतीराम बगाड, अजित राजपूत आणि विनोद बच्छाव यांनी सलमाच्या हालचालीवर पाळत ठेवली होती. सलमाला कोण भेटतात याची माहिती पोलीस ठेवत होते. सलमाला ड्र्ग्ज विकताना पोलिसांनी रंगेहात पकडून तिच्याकडील 104 मार्फीन ड्र्ग्ज हस्तगत केले. हस्तगत केलेल्या ड्र्ग्जची किंमत 5 लाख 50 हजार रुपये आहे.