📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ दक्षिण मुंबईत ‘कॉकटेल विशिष्ट’ पान मसाला तर, मुंबई, ठाणे व भिवंडीत ‘एसएनके’ पान मसालाची खुलेआम बाजारात
◆ कॉकटेल व एसएनकेची मुंबई, ठाणे व भिवंडीत जोमात विक्री?
◆ मुंबई पोलीस केव्हा कारवाई करणार?; नागरीकांचा सवाल!
◆ ‘कॉकटेल विशिष्ट’ चा महाराष्ट्राचा प्रमुख (सीएनएफ) ‘राजू पनवेल’?
◆ ‘एसएनके’ची जबाबदारी ‘अलिम मदनपुरा’कडे…?
◆ …दररोज तब्बल 40 लाखांची उलाढाल?
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्रात किंबहून मुंबई व उपनगरांत सध्या गुटख्याच्या बाजारात ‘कॉकटेल विशिष्ट’ पान मसाला आणि ‘एसएनके’ पान मसाला हे दोन गुटखे दक्षिण मुंबईत दिवसाढवळ्या विकले जात आहेत. मुंबई परिसरांमध्ये या दोन गुटख्यांची जोरदार विक्री होत आहे. दररोज तब्बल 40 लाखांची उलाढाल या गुटख्याच्या माध्यमातून होत असल्याचे समजते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘कॉकटेल विशिष्ट’ पान मसाला आणि ‘एसएनके’ हे दोन पान मसाले सध्या दररोज मुंबईत येत असून हे दोन ही गुटखे कानपूरमध्ये तयार केले जात असून दररोज ट्रक च्या माध्यामातून मुंबईत येतात. ‘कॉकटेल विशिष्ट’ चा महाराष्ट्राचा प्रमुख (सीएनएफ) ‘राजू पनवेल’ आहे तर, ‘एसएनके’ची जबाबदारी अलिम मदनपुरा याच्याकडे आहे. अलिम मुंबई, ठाणे व भिवंडी परिसरातील गुटखा वितरणाचे संपुर्ण काम बघतो. कानपूर मध्ये तय्यार होणार हा गुटखा दररोज मुंबईत येतो व बांद्रा तसेच गुलाल वाडी येथे वितरीत केला जातो. ‘कॉकटेल विशिष्ट’ पान मसाला गुटखा दक्षिण मुंबईत दिवसाढवळ्या विकला जातो.
‘दै.मुंबई मित्र’ ने ‘ऑपरेशन गुटखा’ या मोहिमेअंतर्गत अनेक गुटखा तस्करांची पोलखोल केली असून ‘दै.मुंबई मित्र’च्या पाठपुराव्यामुळेच शौकत अली, फैसल नागोरी अशा बड्या गुटखा तस्करांना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. कालपर्वाच महाराष्ट्र राज्यातील गुटखाबंदी विरोधात याचिका दाखल करणाऱ्या ‘रजनीगंधा’ गुटखा उत्पादकाला सणसणीत चपराक लावत मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावत राज्यातील गुटखा व पान मसाल्यावरील तसेच इतर तंबाखूजन्य वस्तूंवरील बंदी कायम ठेवली आहे. यामुळे ‘दै. मुंबई मित्र’च्या गुटखाविरोधी मोहिमेला चांगलीच बळकटी मिळाली आहे. गेल्या 8 महिन्यांमध्ये ‘दै. मुंबई मित्र’ने गुटख्याविरोधातील ‘ऑपरेशन गुटखा’ मोहिमेअंतर्गत गुटखा विरोधी वृत्तांताबरोबरच सातत्याने लेखी तक्रारींचा सपाटाच लावला होता आणि त्याची प्रशासनाने चांगलीच दखल घेतली होती.
उच्च न्यायालयाने महाराष्ट्रात पानमसाला व गुटखा बंदी संदर्भात कठोर शब्दात आदेश दिले असले तरी गुटखा तस्कर मात्र महाराष्ट्रात गुटखा विक्रीसाठी नवनव्या क्लुप्त्या तयार करीत असून यावर मुंबई पोलीस, ठाणे ग्रामिण पोलीस, ठाणे शहर पोलीस, पालघर पोलीस व वसई-विरार मिरा भाईंदर पोलीस काय कारवाई करतात व मुंबई आणि उपनगरांत दिवसाढवळ्या विकला जाणाऱ्या गुटख्यावर कशा प्रकारे निर्बंध घालतात असा सवाल नागरीक विचारत आहेत.