📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ ठाणे शहर व जळगावमध्ये कोटींचा गुटखा जप्त!
====
ठाणे व जळगावमध्ये गुटखा तस्करीवर मागील दोन दिवसात मोठी कारवाई झाली असून, ठाण्यामध्ये 40 लाख 80 हजारांचा तर जळगावमध्ये 50 लाखांचा गुटखा पकडण्यात आला आहे. मुद्देमाला सहीत ही रक्कम कोटींच्या घरात आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाने पकडलेला गुटखा भिवंडीतील एका गोडाऊनमध्ये ठेवला असल्याचे सांगितले आहे. ‘दै. मुंबई मित्र’ने काही दिवसांपुर्वीच सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भिवंडीत गुटख्याचे गोडाऊन असल्याचे सांगितले होते, त्यावृत्ताला आज पुष्टी मिळाली असून हा ‘दै. मुंबई मित्र’चा ‘इम्पॅक्ट’ मानला जात आहे. महाराष्ट्रात काही तालुके, शहरे गुटखा साठवणूक, विक्रीची मोठी केंद्रे बनली असून गुटखा माफियांची मुजोरी वाढल्याचे एकंदरीत चित्र महाराष्ट्रात आहे.
=====
◆ 55 लाख 90 हजारांचा गुटखा जप्त
◆ ठाणे शहर पोलीसांच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई
◆ नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
◆ शुद्ध पान मसाला व नावी च्युईंग सुगंधी तंबाखूचा समावेश
◆ कर्नाटकमधील हुबळीचा राहणाऱ्या जुनेद सांगण्यावरून गुटखा महाराष्ट्रात
======
ठाणे : कर्नाटक मार्गे भिवंडीतील गोडाऊनमध्ये अवैध्यरित्या आणण्यात आलेला 55 लाख 90 हजारांचा गुटखा ठाणे खंडणी विरोधी पथकाने पकडला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आले असून यात एक कंटेनरही ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी दिली. याप्रकरणी शरीफसाब अब्दुल गौस सावनुर व अहमद अन्वरसाब निजामी यांना अटक करण्यात आले आहे. गोडाऊन मध्ये ‘शुद्ध’ पान मसाला व नावी च्युईंग नावाचा सुगंधी तंबाखू असून हा माल कर्नाटकमधील हुबळी येथे राहणारा जुनेद नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हा गुटखा महाराष्ट्रात पाठवला असल्याचे पोलीस गुन्ह्यात नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे हा जुनेद कोण? याचा पोलीस तपास कसा करणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध्य धंदे चालू राहणार नाहीत, तसेच पाहिजेत असलेले आरोपी पकडण्याबाबतच्या हाती घेतलेल्या मोहिमेत ही कारवाई करण्यात आली आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलीस शिपाई अरंविद शेजवळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीदाराच्या आधारावर 29 मार्च रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास राजलक्ष्मी कंपाऊड, एम गोडावून लगत असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर दोनही आरोपी कर्नाटक मार्गे गुटखा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने सापळा रचून दोघांना अटक करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रतिंबधीत केलेला गुटखा, पान मसाला, तंबाखु जर्दा असा 40 लाख 80 हजारांचा माल व कंटेनर असा मिळून 55 लाख 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो माल भिवंडीमार्गे इतर ठिकाणी पाठविला जाणार होता. अटक आरोपींना 4 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सहायय्क पोलीस आयुक्त, विशेष कार्यदल, गुन्हे शाखा ठाणे शहरचे शेखर बागडे यांनी दिली.
======
◆ जळगावमधील नशिराबाद येथे 60 लाखांच्या गुटख्यावर कारवाई
जळगाव ः जळगावमध्ये आधारे अन्न व औषध प्रशासनाने गुप्त माहितीच्या आधारे नशिराबाद येथे केलेल्या कारवाईत तब्बल 50 लाखांचा गुटखा तसेच वाहन, असा सुमारे 60 लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी संशयितांना ताब्यात घेऊन मोठा साठा हस्तगत केला आहे. जळगावमधील अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा ही गुटखा साठवणूक, विक्री, वाहतुकीची मोठी ठिकाणे आहेत. त्यातच आता भुसावळ, जळगाव शहरातही गुटखा व्यावसायिकांचे जाळे वाढले आहे. प्रशासनाच्या गुप्तवार्ता पथकाने सापळा रचून नशिराबाद येथील जय मुंजोबा पेपर बोर्ड कारखान्यामागील बाजूस असलेल्या गोदामावर छापा घातला. त्यावेळी एका वाहनातून राज्यात बंदी असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा गुदामात उतरवत असताना मिळून आला.
प्रशासनाचे अधिकारी यांनी कारवाई करत सुमारे 48 लाख 27 हजार 900 रुपये इतक्या किमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा, वाहन किंमत सुमारे 10 लाख रुपये मात्र असा एकूण 58 लाख 27 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला. साठा आढळलेले गुदाम पुढील तपासाच्या दृष्टीने सील केले आहे. याप्रकरणी गुदामात आढळलेले संशयित मिथुन कुमार साहनी, अजयकुमार साहनी (दोघे रा. बिहार), फरार वाहन चालक अब्दुल झहीर खान (रा. खरजना, इंदूर), वाहन मालक बलविर सिंह बग्गा (रा. इंदूर), क्रेटा वाहन वाहनातून फरार झालेला मामा (पूर्ण नाव उपलब्ध नाही) नामक मॅनेजर तसेच जागा मालक व साठामालक यांच्याविरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मुख्य साठा मालक, पुरवठादार यांचा शोध घेणे तसेच गुन्ह्यात सहभागी छुपे भागीदार यांचा तपास सुरु आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागच्या राज्याचे गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख राहुल खाडे, मुंबई व नाशिक विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश दाभाडे, यदुराज दहातोंडे, संदीप सूर्यवंशी, शरद पवार यांच्या संपूर्ण पथकाने ही कारवाई केली.