📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
◆ सायबर फसवणुकीतील 24 कोटी 50 लाख रुपये पुन्हा नागरिकांच्या खात्यात जमा
◆ मुंबई पोलीस आयुक्त फणसाळकरांची माहिती
——-
◆ प्रतिनिधी, मुंबई
मुंबईचे कणखर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी अंमली पदार्थ-गुटखा विरोधी मोहीम, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य त्याचबरोबर दर शनिवारी प्रत्येक पोलीस ठाण्यात जनता दरबार आदी अनेक चांगले उपक्रम राबविले. त्याचबरोबर सायबर सुरक्षेवरही विशेष लक्ष देत मुंबईकरांना चांगलाच दिलासा दिला आहे. फणसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्ह्यांवरही मुंबई पोलीस 2023 पासून विशेष लक्ष देत असून गेल्या वर्षभरात फसवणूक झालेल्या नागरिकांच्या बँक खात्यात तब्बल साडे चोवीस कोटी रुपये मुंबई पोलिसांनी परत जमा केले.
टेक इंटरप्रेन्युअर्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे ‘मुंबई टेक विक’ हा स्टार्टअप महोत्सव 18 ते 23 फेब्रुवारी दरम्यान जिओ वर्ल्ड कन्वेक्शन सेंटर,बीकेसी येथे आयोजित करण्यात आला आहे. या ‘मुंबई टेक विक’ मध्ये सहभागी होणार्या तरुणांना टेक्नॉलॉजीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी पहिल्या दिवशी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, फिल्म साथीचे संस्थापक अनुपमा चोप्रा आणि गुगल इंडियाचे उपाध्यक्ष संजय गुप्ता उपस्थित होते.
या महोत्सवात मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी माहिती देताना सांगितले की,बोगस कॉल्स, संदेश, ई-मेल्समुळे नागरिकांचे नुकसानं होऊ नये,यासाठी मुंबई पोलिसांनी 2023 पासून सायबर गुन्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या वर्षभरात 24 कोटी 50 लाख रुपये फसवणूक झालेल्या नागरिकांच्या बँक खात्यात मुंबई पोलिसांतर्फे जमा करण्यात आले आहेत.’ असेही फणसाळकर यांनी सांगितले.
सदर महोत्सवात स्टार्टअप करू इच्छिणार्या तरुण मार्गदर्शन आणि काही प्रसिद्ध नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.







