📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
नंदुरबारमध्ये 2 वाहनांसह 53 लाखांचा गुटखा जप्त!
पोलीस अधिक्षक श्रवण कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाई
——–
विशेष प्रतिनिधी, नंदुरबार
गुटखा विक्रेत्यांवर कारवाईची टांगती तलवार! नंदुबारच्या शहादा तालुक्यात पोलिसांनी दोन ठिकाणी छापेमारी करून 53 लाखाचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईमुळे गुटखा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
म्हसावद
खेतिया ते शहादा मार्गावर संशयस्पत ऑटो रिक्षा अडवण्यात आली. रिक्षामध्ये 51,480 रुपये किंमतीचे 260 पाऊच विमल पान मसाला, 8,580 रुपये किंमतीचे 260 पाऊच वी-1 तंबाखू, 28,200 रुपये किंमतीचे 60 खोके विमल पान मसाला, 1,800 रुपये किंमतीचे 60 खोके वी-1 तंबाखू, 8,712 रुपये किंमतीचे 44 पाऊच किंग पॅक विमल पान मसाला आणि 968 रुपये किंमतीचे 44 प्लॉस्टिक पाऊच वी-1 तंबाखू जप्त करण्यात आले. रिक्षा (3,00,000 रुपये) देखील जप्त. अन्सारी फैजान सिराज अहमद (वय 23, रा. धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल.
शहादा
दहा चाकी ट्रकमधून 52 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त. ट्रक (10 लाख रुपये) देखील जप्त. गुन्हेगारी तपास शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारवाई.
नंदुबारचे नवीन पोलीस अधिक्षक श्रवण कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुटखा विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी कडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे गुटखा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.