📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ दिंडोशीत 2 कोटींचा गुटखा जप्त
◆ गोदाम व टेंपोवर धाड । विमल, राजनिवास, रजनीगंधा, एके आदी गुटख्यांचा समावेश
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांचे गुटख्यावरील कारवाईच्या आदेशानंतर महाराष्ट्र पोलिसांकडून राज्यभरात दररोज गुटखा तस्करी करणाऱ्यांवर कारवाया होत आहेत. ज्यामध्ये मुंबई पोलीस, ठाणे पोलीस, पालघर पोलीस तसेच पुणे पोलीस, धुळे पोलीस आघाडीवर आहेत. मुंबई पोलीसांकडून करोडो रुपयांचा गुटखा आजवर जप्त करण्यात आला आहे. त्याचपार्श्वभुमीवर दिंडोशी पोलीसांकडून गुटख्यावर मोठी कारवाई करण्यात आली असून, दिंडोशीत तब्बल 2 कोटींचा गुटखा दोन विविध गोदामातून व टेंपोमधून जप्त करण्यात आला असल्याचे समजते. ज्यामध्ये विमल, राजनिवास, रजनीगंधा, एके आदी गुटख्यांचा समावेश असून, महेंद्रा बोलेरो (एमएच. 47 एस. 9006) गाडीमध्ये 30 ते 40 गोणी गुटखा होता. दिंडोशीतील शिवशाही प्रकल्प येथे ही कारवाई करण्यात आली.
‘दै. मुंबई मित्र’ मागील 4-5 महिन्यांपासून ‘ऑपरेशन गुटखा’ अंतर्गत राज्यभरातील गुटखा तस्करीची इत्यंभूत बातमी देण्याचा प्रयत्न करीत आहे. याशिवाय याबाबतीत अधिकृत तक्रारी सुद्धा शासनाला देत असल्याने राज्य सरकारने गुटखा संदर्भात दिलेल्या आदेशामुळे राज्यभरात मोठ्याप्रमाणत कारवाया होत आहेत.
========
◆ बुलढाण्यात कारमधून गुटखा तस्करी करणाऱ्याला अटक
◆ सव्वा सात लाखांचा मुद्देमाल जप्त
◆ एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर दसरखेड पोलिसांनी हरसोडा फाट्यावर गुटखा घेऊन जाणाऱ्या कारसह 7 लाख 29 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रात्रीच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिस मध्यरात्रीनंतर पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पांढऱ्या रंगाची कार ही अवैधरित्या गुटखा भरून कु-हा गावाकडुन धुपेश्वर मार्गे हरसोडा रोडने जाणार आहे अशी खबर मिळाली होती.
त्यावरून पोलिसांनी तात्काळ हरसोडा फाटा येथे सापळा लावला. रात्री 1.45 वाजताचे सुमारास कार वेगाने धुपेश्वर रोडकडुन हरसोडा रोडने येताना दिसले. वाहनाला हरसोडा फाटयावर प्राथमिक शाळेजवळ थांबविले. वाहनामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसालाचा माल असल्याने पोलिसांनी वाहन चालकास ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे आणले.
तसेच पंचाना बोलावुन पंचासमक्ष व वाहन चालक व एक व्यक्ती यांच्या समोर वाहनाची पाहणी करण्यात आली. या कारवाईत कार 5 लाख रूपये, 2 लक्ष 29 हजार 880 रुपयाचा गुटखा माल असा एकूण 7 लाख 29 हजार 880 रुपयाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
