📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
◆ उद्धव ठाकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का
◆ रवींद्र वायकर करणार शिवसेनेत प्रवेश
◆ सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश
◆ वायकर आणि मुख्यमंत्री यांची काही दिवसांपूर्वी झाली होती गुप्त बैठक
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबीक संबंध असलेले नेते आणि आमदार रवींद्र वायकर हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार आहे. रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिला आहे. रवींद्र वायकर यांच्यासोबत स्थानिक शिवसैनिकही शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. वायकर यांनी सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांची ईडीची चौकशीही सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजच ट्विट करुन, रवींद्र वायकर यांना ईडी धमकावत असल्याचं म्हटले होते. तसंच रवींद्र वायकर यांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचे राऊतांनी म्हटले होते.
आम्ही मुळचे शिवसैनिक आपल्या सोबत काम करण्याची ईच्छा: वायकर
रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाल्याची माहिती होती. या बैठकीत वायकरांनी शिंदे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही मुळचे शिवसैनिक आहोत, धनुष्यबाणाचे पाईक आहोत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचे आहे, असे वायकरांनी एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचे समजते.
गुप्त भेटीनंतर निर्णय
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचा एक आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा होती. मात्र, आता आमदार रवींद्र वायकर ते आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी ईडीने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात रवींद्र वायकर यांची चौकशी केली होती. गेल्या महिन्यात रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाडही टाकली होती. त्यानंतर आता रवींद्र वायकर आता शिंदे गटात प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.