📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ मुंबईचे के/पश्चिम वार्ड बनले बेकायदेशीर बांधकामांचे माहेरघर!
◆ जोगेश्वरीतील रीपॉन अर्पाटमेंटमधील 6 दुकांनाकडून बेकायदा बांधकाम
◆ होणारी कारवाई अचानक का थांबली? । कारवाईच्या नावाखाली कागदी घोडे नाचवण्याचे काम सुरु
——-
मोहसीन शेख, विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई ः मुंबईमध्ये 84 हजार 364 अनधिकृत बांधकामे झाल्याची नोंद पालिककडे नोंद आहे. त्यापैकी 5 टक्के बांधकामावर कारवाई करण्यात आली असल्याचे समजते यावरून मुंबई महापालिका बेकायदा बांधकाम हा विषय किती गंर्भियाने घेते याचा प्रत्येय नागरीकांना येऊ लागला आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या के/पश्चिम वार्ड अंतर्गत एस.व्ही. रोड, राज नगर समोर, जोगेश्वरी (प.) येथील रीपॉन अर्पाटमेंट इमारतीच्या खाली असणाऱ्या दुकानांनी हजारो स्कवेअर फुटांचे बेकायदा पत्राशेड बांधकाम केले असून याबाबत तक्रारी करुन ही पालिका कारवाईच्या नावाखाली कागदी घोडे नाचवण्याचे काम करीत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पालिका काल-पर्वामध्ये कारवाईस जाणारी होती पण असे काय घडले ज्यामुळे पालिका अचानक कारवाईस थांबली याबाबत पालिकेवर संशय व्यक्त केला जात असल्याचे समजते.
जोगेश्वरीतील रीपॉन अर्पाटमेंट इमारतीच्या तळाला असणाऱ्या तब्बल 6 दुकानांनी मुंबई महापालिकेच्या के/पश्चिम वार्डच्या नाकावर टिच्चून बेकायदा बांधकाम केले आहे. ज्यामध्ये दुकान क्र. 1 हुडा मेडीकल, दुकान क्र. 2 पॅशन शुज, दुकान क्र. 3 व 4 शितल स्विट्स, दुकान क्र. 6 ओमायर मेडीकल, दुकान क्र. 7 शितल केक शॉप, दुकान क्र.8 पॅशन शुज यांचा समावेश आहे. दुकान क्र. 7 च्या शितल केक शॉपने तर बेकायदेशीरपणे बेसमेंट (तळघर) बनवले आहे. ही बाब संपुर्ण इमारतीला धोकादायक असून याचे पालिकेला काडीमात्र सोयरसुतक नाही असा आरोप जोगेश्वरीकर करीत आहेत. याबेकायदा बांधकामांबाबतीत अनेक तक्रारी दिल्या गेल्या आहेत. माहिती अधिकारही टाकले गेले असताना ही के/पश्चिम वार्ड मात्र कारवाईच्या नावाखाली फक्त कागरी घोडे नाचवीत आहे. आता यावर पालिका तोडक कारवाई करुन एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
याबाबतीत ‘दै. मुंबई मित्र’ने याच इमारतीतील दुकान ज्यांनी बेकायदा बांधकाम केलेले नाही असे नुर ऑप्टीक्सचे दुकान मालक शफी मुखी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ही दुकाने जेवढी आत आहेत तेवढीच बाहेर बेकायदा बांधकामे केली असून आम्ही स्वतः दुकान मालक असून बेकायदा बांधकामाला केव्हा ही पाठिंबा देत नाही. असे यावेळी ते म्हणाले.