आमोदे (ता.शिरपूर) गावाजवळील शिरपूर फाटा येथे पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या ट्रकमध्ये (क्र.एमएच १८-बीए०१३६) महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक छाया पाटील व पथकाने ट्रक पकडला. ट्रकची तपासणी केली असता, त्यात विविध प्रकारचा ६० लाख ३७ हजार ६०० रुपयांचा गुटखा आढळून आला.
