धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांना सकाळच्या सुमारास इंदूरकडून धुळ्याकडे राष्ट्रीय महामार्गातील अशोक लेलँड कंपनीच्या पांडुरंगाच्या वाहनातून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर सापळा रचण्यात आला. संबंधित वाहन आढळल्यावर पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्यात जवळपास 85 हजार पन्नास रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. वाहनाची किंमत तब्बल वीस लाख रुपये आहे. या कारवाईत 20 लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
