📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
———–
◆ वसईच्या ‘मुंबई अमृततुल्य’ विरुद्ध तक्रारींचा पुरावा
◆ 13 सप्टेंबर ते आजपर्यंत अनेक वेळा माणिकपूर पोलीस ठाणे व कंट्रोल रुमला दिल्या होत्या तक्रारी
———–
विशेष प्रतिनिधी, वसई
वसई रेल्वे स्थानकाशेजारील ‘मुंबई अमृततुल्य’ हे नाष्ट्याचे दुकान रात्री उशिरापर्यंत सुरू सल्याने तेथे गुटखा खाणार्यांची आणि सिगारेट ओढणार्यांची झुंबड उडालेली असते. यामुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात असल्याबद्दलचे वृत्त ‘दै. मुंबई मित्र’ने’ ‘वसईच्या मुंबई अमृततुल्यमुळे महिलांची सुरक्षा धोक्यात’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. याप्रकरणी ‘दै. मुंबई मित्र’च्या प्रतिनिधीने ‘मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस’ कंट्रोल रूम आणि माणिकपूर पोलीस ठाण्याकडे असंख्य तक्रारी केल्या.त्याचा गोषवारा तारीखवार देत आहोत.
वसईतील ‘मुंबई अमृततुल्य’मध्ये मध्यरात्री गुटख्यासाठी आणि सिगारेटसाठी प्रचंड झुंबड उडालेली असते. या गर्दीत गर्दुल्ले, बेवडे यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याने रस्त्यावरून येणार्या महिलांची कुचंबणा होत असून त्यांची सुरक्षा धोक्यात आल्याचे ‘दै. मुंबई मित्र’च्या प्रतिनिधींच्या लक्षात आल्यावर सदर प्रतिनिधीने पोलिसांकडे तक्रारींचा सपाटा लावला, मात्र, गेले तीन महिने सातत्याने पाठपुरावा करूनही ‘मुंबई अमृततुल्य’ अद्यापपर्यंत अव्याहतपणे सुरूच आहे. प्रतिनिधीने केलेल्या तक्रारींचा गोषवारा पुराव्यासह पुढीलप्रमाणे.
माणिकपूर पोलीस ठाण्याचे सध्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने आहेत. यापूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे संपत पाटील होते. त्यांना 18 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 2 वाजून 2 मिनिटांनी व्हाटस्अप वरून ‘मुंबई अमृततुल्य’ समोरील गर्दीच्या फोटोसह तक्रार केली. त्यानंतर 26 ऑगस्ट रा. 2.28 मि., 28 ऑगस्ट रा. 12 .37 मि., 5 सप्टेंबर रा. 1.23 मि. तक्रार केली. प्रत्येकवेळी संपत पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले. परंतु त्यांच्या हाताखालील पोलीस कर्मचार्यांनी ठोस कारवाई केली नाही.
त्यानंतर सदर प्रतिनिधीने 13 सप्टें रोजी 1.50 मि. मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस मुख्यालयाचा मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून फोटो देखील पाठविले.. कंट्रोल रूमबरोबरच माणिकपूर पोलिसांनाही फोटो पाठविले. 14 सप्टेंबर रोजी रा. 12.33, 15 सप्टेंबर रोजी रा.12.30 आणि 18 सप्टेंबर रोजी रा.12.30 वाजता कंट्रोल रूमबरोबर फोटोसकट संपर्क केला.त्यांच्याप्रमाणे माणिकपूर पोलिसांनाही फोटोसकट तक्रार पाठविली.
विशेष म्हणजे 15 सप्टेंबर 2023 रोजीच्या फटोमध्ये चक्क एक पोलीस कर्मचारीच गुटखा नेताना दिसत आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतरही पोलीस कर्मचारी ‘मुंबई अमृततुल्य’वर कारवाई का करत नाहीत,हे बहुधा या फोटोवरूनच थोडेफार स्पष्ट होत असावे.