📰 MUMBAI MITRA ENTARTAINMENT
———–
◆ मी अँड मॉम सीझन – 2 यशस्वी
———-
3 डिसेंबर 2023 रोजी अंधेरी पूर्व येथील कोहिनूर कॉन्टिनेन्टल मध्ये ‘मी अँड मॉम’ (सिझन-2) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत रंगतदार झालेल्या या सौंदर्य स्पर्धेमध्ये ‘धडक कामगार युनियन’चे संस्थापक-महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या आयोजक उर्मिला वर्मा यांनी अभिजीत राणे यांचा शाल, श्रीफळ, बुके आणि ट्रॉफी देऊन सत्कार केला व त्यांचे आभार मानले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना अभिजीत राणे यांनी हा कार्यक्रम आयोजित करणार्या उर्मिला वर्माचे कौतुक केले. ‘उर्मिला या अत्यंत मेहनती असून त्या आमच्या संस्था परिवाराशी जोडल्या गेल्या आहेत. ‘दै. मुंबई मित्र’ व ‘धडक कामगार युनियन’ तर्फे त्यांना भविष्यात पाठिंबा देऊ’ अशी ग्वाही अभिजीत राणे यांनी दिली.
या कार्यक्रमामध्ये प्रेरणा भट, विजय बादलानी, महिरा खुराना, यश सेहगल, अथर्व शर्मा हे सेलिब्रेटी पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धा सोहळ्यासाठी ‘मिस युनिव्हर्स’, माधुरी पाटले, ‘मी अँड मॉम सिझन 1’च्या विजेत्या सोनम ठाकूर आणि साची ठाकूर, डॉ. सुरैयना राणे-मल्होत्रा यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.
‘मी अँड मॉम सिझन 2’चा मुकुट दिशा पारीख आणि ट्विंकल पारीख यांनी पटकावला. फर्स्ट रनर अप म्हणून अर्जुन कोसंबी आणि जागृती कोसंबी तर सेकंड रनरअप म्हणून विरा शाह आणि पूजा शाह ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘मिस इंडिया’ असलेल्या जगप्रसिद्ध सूत्रसंचालिका सिमरन आहुजा हिने केले. हा कार्यक्रम ‘अॅस्पिरेशन इव्हेंट’च्या संस्थापिका उर्मिला वर्मा यांनी आयोजित केला होता तर ‘दै. मुंबई मित्र’ या कार्यक्रमाचा मिडिया पार्टनर होता.