📰 MUMBAI MITRA EXPOSE
———–
◆ भारतातील पहिलेच वेगळ्या तस्करीचे प्रकरण
◆ चहाच्या नावाखाली खातच्या पानांची तस्करी
◆ मुंबई गुन्हे शाखेने 40 लाखांची खातची पाने केली जप्त : एकाला अटक
————-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
चहाच्या पार्सलमधून पाठविण्यात आलेली सुमारे 40 लाख रुपये किमतीची खातची पाने अंमली पदार्थ विरोधी शाखेने (एनसीबी) जप्त केली असून 6 किलो 94 ग्रॅम वजनाच्या या प्रतिंधित खातच्या तस्करी प्रकरणी एका येमेनच्या नागरिकाला अटक करण्यात आली आहे. अशश प्रकारच्या तस्करीचे हे भारतातील पहिलेच प्रकरण असून एनसीबी अधिक तपास करत आहे.
पोलीस सूत्रांनुसार, अंमली पदार्थ विरोधी शाखेच्या (एनसीबी) मुंबई शाखेने 40 लाख रुपये किमतीच्या खातच्या पानांची दोन पार्सल जप्त केली. ही पार्सल चहाच्या नावाखाली पाठविण्यात आली होती. खात पानांच्या बेकायदेशीर आयातीत गुंतलेल्या मध्यपूर्वेतील अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटची एनसीबीकडे गुप्त माहिती होती. एनसीबीने येमेन नागरिकांच्या एका गटावर पाळत ठेवली होती.
रेच दिवस पाळत ठेवल्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी खातच्या पानाची पार्सल आल्याचे कळले. मुंबईच्या परदेशी पोस्ट कार्यालयात दोन पार्सल रोखण्यात आले. एक पार्सल 2.98 किलो तर दुसरी पार्सल 3.96 किलो खात पानांचे होते. हे पार्सल उघडले असता त्यात चहाच्या नावाखाली खातची कोरडी पाने होती. याप्रकरणी गलाल एनएमएए नावाच्या येमेन नागरिकाला अटक करण्यात आली. कारण त्याचा या पार्सलशी संंध असल्याचे एनसीबीला तपासात आढळून आले.
खातची झाडे अनेक चांगल्या गुणधर्मासह सदैव टवटवीत राहणारी असतात.या झाडांच्या पानाचा रस हा अनेक औषधांमध्ये वापरला जातो.मात्र, खतच्या पानांच्या रसात एक प्रकारची मादकता असल्याने गुंगी येण्यासाठी ड्रग्जमध्ये ही पाने वापरली जातात.त्यामुळे नार्कोटिक ड्रग्ज एन्ड सायकॅट्रॉपीक सबस्टन्सेस ऍक्ट (एनडीपीएस ) अर्थात अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत 2018 साली भारतात खतच्या पानांवर बंदी घालण्यात आली आहे. खातच्या पानांना ‘कॅथा एज्युलिस’ किंवा ‘मिरा लीव्हज’ असेही म्हटले जातात. मात्र भारतात खातच्या पानांवर बंदी घालण्यात आल्याने अंमली पदार्थ बनविण्यासाठी याची तस्करी केली जाते. खातच्या पानांना अवैध ड्रग्ज व्यवसायात प्रचंड मागणी असून त्यासाठी चढ्या भावाने याची विक्रीही होते.
मात्र भारतातील खातच्या पानांची तस्करीचे उघड करण्याचे पहिलेच प्रकरण आहे. आणि यात मुंबईच्या गुन्हे शाखेने आघाडी घेतल्याचे चित्र आहे.