मराठी मनोरंजनसृष्टीतला चॉकलेट हिरो म्हणून वैभव तत्तवादीला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर वैभवने वेगळं स्थान निर्माण केले आहे. मराठीबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये वैभवने काम केले आहे. वैभव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान वैभनवने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअऱ केला आहे.
सध्या वैभव थंड हवेच्या ठिकाणी सुट्टी घालवत आहेत. वैभवने आपल्या ट्रीपदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअऱ केले आहेत. दरम्यान वैभवने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. वैभव गायक दर्शन रावलच्या ‘माहिये जिन्ना सोना’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. वैभवचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.
वैभवच्या कामाबद्दल बोलायचे झाल तर छोट्या पडद्यापासून वैभवने त्याच्या अभिनय करिअरला सुरुवात केली. ‘फक्त लढ म्हणा’, ‘सुराज्य’ चित्रपटांमधील वैभवच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. ‘कॉफी आणि बरचं काही’ ‘मि. अॅण्ड मिसेस सदाचारी’ चित्रपटातील त्याच्या आणि प्रार्थना बेहरेच्या जोडीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मराठीबरोबर बॉलीवूडमध्ये वैभवने आपल्या वेगळा ठसा उमटवला आहे. रणवीर सिंहच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात त्याने चिमाजी अप्पा हे पात्र साकारले होते. या भूमिकेचे सगळ्यानी कौतुक केले होते.