📰 DAILY MUMBAI MITRA IMPACT
———
◆ नंदुरबार पोलीसांकडून गुटख्याच्या ट्रकसह 15 लाखांचा मुद्दमाल जप्त
——-
विशेष प्रतिनिधी, नंदुरबार
मध्य प्रदेशातील खेतियाकडून येणाऱ्या ट्रकमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला आठ लाख 98 हजार 560 रुपये किमतीचा सुगंधी गुटखा, पानमसाला व सहा लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 14 लाख 96 हजार 560 रुपये किमतीचा मुद्देमाल शहादा पोलिसांनी जप्त केला. गोपनीय माहितीचा आधार घेत शहादा शहरास लागून असलेल्या लोणखेडा बायपास रस्त्यावर नियोजित नवीन बसस्थानकासमोर ट्रक थांबवून त्याची तपासणी केली असता परचुटन मालाच्या आडोशाला सुगंधी मसाला व इतर पानमसाला आढळला.
या कारवाईमुळे प्रतिबंधित पानमसाला अवैध मार्गाने विकणाऱ्यांचे धाबे दणदणाले आहे. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्वत्र ठिकठिकाणी नाकेबंदी सुरू आहे. याच अनुषंगाने शहादा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत पंधरा दिवसांपासून नाकेबंदी करत आहेत. शनिवारी (ता. 28) त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत व पोलिस कर्मचारी नवीन बसस्थानकासमोर सापळा रचून होते.
दुपारी चार-साडेचारच्या दरम्यान खेतिया ते शहादा मार्गावर नवीन बसस्थानकासमोर वाहन (एमपी 09, जीजी 0011) थांबवून ट्रकमधील मालाची खात्री केली असता परचुटन मालाच्या आडोशाला महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधी पानमसाला व तंबाखू चोरट्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होत असताना मिळून आले. ट्रक (एमपी 06, जीजी 0011)ची तपासणी केली असता पानमसल्यासह 14 लाख 98 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल मिळाला.
