📰 DAILY MUMBAI MITRA IMPACT
———
खाद्यपदार्थांच्या आड गुटखा तस्करी करणाऱ्या ट्रकवर धुळे पोलीसांची कारवाई
——-
विशेष प्रतिनिधी, धुळे
खाद्य पदार्थांच्या गोण्याआड लपवून गुटख्याची तस्करी करणाऱ्या ट्रकवर मोठी कारवाई करत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनीं 81 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मध्यरात्री उशीरा झालेल्या या कारवाईत शिखर, कुलदीप, गुटख्यांसह गणेश सुगंधी पान मसाला सापडला.
‘दै.मुंबई मित्र’ने जुलै 2023 पासून गुटख्याविरोधात ‘ऑपरेशन गुटखा’ ही मोहीम उघडली आहे. या मोहिमेमुळे पोलिसांनी गुठखा विरोधात जोरदार कारवाई सुरू केली असून ते गुटखा तस्करांचे कंबरडेच मोडत आहेत.
पोलीस सूत्रांनुसार धुळ्यातील शिरपूर तालुक्यामध्ये मुंई- आग्रा महामार्गावर हाडाखेड येथे शिरपूर तालुका पोलिसांनी नाकांदी केली होती. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका संशयित ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये रवा आणि मैद्यांच्या पोत्याआड गुटख्याच्या गोण्या असलेल्या पोलिसांना आढळल्या. पोलिसांनी या गोण्या उघडून पाहिल्या असता त्यामध्ये शिखर पान मसाला, कुलदीप सुगंधित तांखू, गणेश सुगंधी सुपारी असा 51 लाख 77 हजार 109 रुपयांचा प्रतिसंधित गुटखा सापडला.
या मुद्देमालासह पोलिसांनी 30 लाखांचा ट्रक असा एकूण 81 लाख 66 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ट्रकचा चालक आणि क्लीनरला अटक करण्यात आली. शिरपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांनी ही मोठी कारवाई केली. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक किशोर बाविस्कर यांनी तक्रार नोंदविली आहे.
