📰 DAILY MUMBAI MITRA EMPACT
————-
◆ वणी पोलीस ठाण्याची कारवाई
◆ नाशिकमध्ये 39,34,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त
◆ पकडण्यात आलेले आरोपी मांगीलाल हरिसिंग डांगी, बने बाबुलाल सिंग, विकी मंगलानी, शाकिब शेख, रॉयल टान्सपोर्ट
◆ विमल, राज-निवास, जाफरानी जर्दा, राज निवास सुगंधीत पान मसाला असा विविध प्रकारचा गुटखा जप्त करण्यात आला.
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘दै.मुंबई मित्र’मुळे महाराष्ट्रभर गुटखा माफियांवर पोलीस कडक कारवाई करताना दिसत आहेत. काल नाशिक येथील (वणी) येथे पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा पकडला आहे.22 सप्टेंबर रोजी वणी, पिंपळगाव बसवंत ते वणी रोडवर ता. दिंडोरी, जि.नाशिक येथे सायंकाळी 4 च्या सुमारास पोलिसांना 3015 मॉडेलचा 6 टायर मालट्रक क्र.( DD-01-G-9092) वाहतूक करताना आढळला. तो ट्रक थांबवून त्याची पाहणी केली असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला, विमल पान मसाला (गुटखा) आढळून आला. महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी बेकायदेशीर वाहतूक करून जप्त केलेल्या गुटख्याची किमंत तब्बल 39,34,000/- इतकी आहे. यामध्ये 4,23,000 /- रुपये किमतीचा विमल गुटखा पान मसाल्याचे 10 पॅकेट्स प्रत्येकी 470/- रुपये किमतीचे, तर विमल गुटख्याच्या 10 पुड्या, प्रत्येकी 47 रुपये किमतीच्या (असे एकूण 9 मोठे खाकी बॉक्स आढळले) त्यात एक लहान खाकी बॉक्स, ज्या बॉक्समध्ये 10 प्लॅस्टिक बॅग, ज्यात विमल V – 1 नावाच्या गुटख्याचा जर्दा तंबाखूचे 10 पॅकेट्स प्रत्येकी 300/- रुपये किमतीचे, त्या पॅकेट्समध्ये विमल V – 1 नावाच्या गुटख्याचा जर्दा तंबाखूच्या 10 पुड्या प्रत्येकी 3 रुपये किमतीच्या असे एकूण 9 लहान खाकी बॉक्स आढळले. तर एका मोठ्या सुती पोत्यात 10 पिवळ्या रंगांचा प्लॅस्टिक लहान गोण्यांमध्ये विमल गुटखा पान मसाल्याची 20 पॅकेट्स प्रत्येकी 198/- रुपय किमतीचे ,तर पॅकेट्समध्ये विमल गुटखा मसाल्याच्या 11 पुड्या प्रत्येकी 18 रुपये किमतीच्या अशी एकूण 23 सुती पोती सापडली. एका मोठ्या निळ्या रंगाच्या प्लास्टिक गोणीत 10 निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या लहान गोण्यांत विमल V – 1 नावाच्या गुटख्याचा जर्दा तंबाखूची 22 पॅकेट्स प्रत्येकी 22/- किमतीची, त्या पॅकेट्स मध्ये V – 1 नावाच्या गुटख्या जर्दा तंबाखूच्या 11 पुड्या प्रत्येकी 2 रुपये किमतीच्या अशा एकूण 5 मोठ्या निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोण्या आढळल्या. एका मोठ्या चॉकलेटी रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोणीत 8 सफेद रंगाच्या लहान गोण्यांमध्ये प्रीमियम राज-निवास सुगंधीत पानमसाल्याची 27 पॅकेट्स प्रत्येकी 192/- रुपये किमतीच्या, त्या पॅकेट्समध्ये प्रीमियम राज-निवास सुगंधीत पानमसाल्याच्या 48 पुड्या प्रत्येकी 4/- रुपये किमतीच्या अशा एकूण 10 मोठ्या चॉकलेटी रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोण्या सापडल्या. एका गुलाबी रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये 5 सफेद रंगाच्या प्लॅस्टिकच्या मध्यम गोण्यात 8 सफेद रंगाच्या प्लॅस्टिकच्या लहान गोण्यात प्रीमियम राज-निवासाच्या ZL – 01 नावाचा जाफरानी जर्दा तंबाखूची जाफरानी 27 पॅकेट्स प्रत्येकी 48/- रुपये किमतीचे, त्या पॅकेट्स मध्ये राज-निवासाच्या ZL -01 नावाच्या जाफरानी तंबाखूच्या 48 पुड्या प्रत्येकी 1/- किमतीची. अशा एकूण गुलाबी रंगाच्या 2 मोठ्या गोणी सापडल्या. याप्रमाणे वरील वर्णनाचा सुगन्धी गुटखा पानमसाला. त्याचप्रमाणे एका प्लास्टिक गोणीत सफेद रंगाचा प्रत्येकी 1400/- रुपये किमतीचा असा एकूण 150/- प्लॅस्टिकच्या गोणी सापडल्या. तसेच एक चॉकलेटी रंगाचा आयसर कंपनीचा 3015 मॉडेलचा 6 टायर मालट्रक क्र. DD-01-G-9092 वापरण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले. या प्रकरणी वणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरन. 386/2023 भादवी.
कलम – 328, 188, 272, 273, 34 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा सन 2006 चे कलम – 26(2)(i), 26(2)(iv), 27 (1), 30 (2)(a), 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रॅकवरील चालक मांगीलाल हरिसिंग डांगी, वय (25) राहणार – बडवेली, ता.खिलचीपूर, जि.राजगड, मध्यप्रदेश. बने बाबुलाल सिंग, वय (33) क्लिनर, राहणार घर न.125, अनुसूचित जाती मोहल्ला, वॉर्ड -11, ग्राम बडागाव, ता.नलखेडा, जि.आगर माळवा, बंदगो, शाजापूर मध्यप्रदेश, विकी मंगलानी, डीलर अमरावती शाकिब शेख, जुहू गल्ली,अंधेरी-मुंबई, माल घेणारा, रॉयल ट्रान्सपोर्ट, इंदोर मध्यप्रदेश यांना पकडण्यात आले असून या प्रकरणी वणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे, पोलीस उपनिरीक्षक (नाशिक ग्रामीण) महेश शिंदे हे अधिक तपास करत आहेत.
