📰 DAILY MUMBAI MITRA EMPACT
————-
◆ कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाखोंचा गुटखा जप्त
◆ हॉट पान मसाला, एच टू के तंबाखू व सनकी पान मसाला अशा प्रतिबंधित गुटख्यांचा समावेश
◆ पकडण्यात आलेला आरोपी राहण्यास मीरा रोडला
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
गुटखा माफियांचा संपूर्ण पर्दाफाश करून त्यांचा पुरता बीमोड करण्याचा विडा दै.मुंबई मित्र’ने उचलला असून ‘दै मुंबई मित्र’मुळे महाराष्ट्र भरात गुटख्यावर कारवाई होत आहे कालच बुलढाणा पोलिसांकडून करोडो रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. यापूर्वी ही पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई पालघर पोलिसांकडून करण्यात आली होती.काल 20 सप्टेंबर रोजी कासा पोलीस संध्याकाळी 5 वाजता, आंबोली बिट भागात पेट्रोलिंग करताना मोडगाव हळदपाडा गावचे हद्दीत संशयित आयसर टेम्पो क्रमांक एमएच -48 -सी.बी. 5708 उभा असल्याचे आढळून आला. या टेम्पोस थांबवून त्याची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रत प्रतिबंधित असलेला पान मसाला (गुटखा) आढळला. महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी बेकायदेशीर वाहतूक करून जप्त केल्या गुटख्याची किमंत तब्बल 26,48,800 आहे.
यामध्ये 4,36,800/- रुपये किमतीचा हॉट पान मसाला एकूण 2912 पॅकेट्स प्रत्येकी 150 रुपये किमतींचे, 2,18,400/- रुपये किमतींचे एच टू के तंबाखू एकूण 2912 पॅकेट्स, प्रत्येकी 75 रुपये किमतींचे, 5,54,400/- रुपये किमतींचे सनकी पान मसाला एकूण 3960 पॅकेट्स प्रत्येकी अंदाजे 140 रुपये किमतींचे असा 7,39,200/- रुपये किमतींचा गुटखा पकडण्यात आला. तसेच 7,00,000/- रुपये किमतींचा लाल रंगाचा आयसर (टेम्पो क्रमांक एम.एच.48, सी.बी.5708 जु.वा.कि..सु.) एकूण 26,48,800/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कासा पोलीस ठाणे येथे 150/2023 भा.द.वि.सं. कलम 328,188,272,273,34 सह अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 नियम व नियमने 2011 चे कलम 26(2)(4),27(2)(ई)23(1),30 2)(ए) सहवाचन मा.अन्न सुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य अधिसूचना अ.सु.म.अ./अधिसूचना/794/2018/7 दिनांक 20/7/2018 व अधिसूचना क्र.अ.सु.मा.का./अधिसूचना/795 regulation 20.2.3.4 of food safety and standerd (prohibition and restrictions on sales) regulation 2011 सहवाचन regulation no. 3,1 ,7 of food safety and standerds (food product standerds and food additives) 2011 शिक्षा कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून टेम्पोवरील चालक आरोपी सुशील सीताराम साहनी याला अटक करण्यात आली आहे. पकडण्यात आलेला आरोपी मांडवीपाडा, साईधाम चाळ, काशिमीरा, मीरारोड पूर्व, जिल्हा ठाणे राहणारा असून मूळचा घटोहो नवनंबर वाड ता. विध्यापती जि.समस्तीपूर, राज्य बिहार चा आहे. गुन्ह्याचा पुढील तपास कासा पोलीस ठाणे हे करत आहेत.