📰 DAILY MUMBAI MITRA EMPACT
————-
◆ ‘राज निवास’च्या ट्रकवर कारवाई
◆ तब्बल अंदाजे 1 कोटी बाजारभाव असलेला गुटखा जप्त
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
गुटखा माफियांचा संपूर्ण पर्दाफाश करून त्यांचा पुरता बिमोड करण्याचा विडा ‘दै. मुंबई मित्र’ने उचलला आहे. ‘दै. मुंबई मित्र’च्या ऑपरेशन गुटखा’ मोहिमेअंतर्गत आतापर्यंत बर्याच गुटखा तस्करांची पोलखोल करण्यात आली आहे. बुलढाणा पोलीस अंतर्गत येणार्या मलकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुलढाणा पोलिसांकडून काल ‘राज निवास’ गुटख्याचा ट्रक खामगाव मलकापूर हायवे वरील खालसा हॉटेल वर पकडण्यात आला असून त्या ट्रकचा नंबर (NL-01 N 5196) आहे. संपूर्ण माल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला हा माल असल्याचे समजते. जप्त केलेल्या मालाची अंदाजे किंमत तब्बल 1 कोटीच्या घरात असल्याचे समजते. याबाबतचा पुढील तपास बुलढाणा पोलिसांकडून सुरू आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण गुटखा दिलीप रमेश बदलानीचा असल्याचे समजते.
‘दै. मुंबई मित्र’ने 29 ऑगस्ट 2023 रोजी ‘मराठवाड्याचा राज-निवास’चा प्रमुख दिलीप रमेश बदलानी?’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती, ज्यामध्ये मराठवाड्यात गुटख्याच्या होणार्या तस्करी संदर्भात वृत्त देण्यात आले होते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘राज निवास’चा मराठवाड्यात गुटख्याचे प्रमुख वितरक म्हणून ओळखला जाणारा दिलीप बादलानी हा सुरुवातीला तेलाचे काम पाहायचा. त्यानंतर त्याने जळगाव एमआयडीसी येथे खतनिर्मितीचा कारखाना (फर्टिलायझर कंपनी) उघडला. मात्र, त्याला अपेक्षित फायदा मिळत नव्हता. मग त्याने मध्य-प्रदेशातील बुर्हाणपूर येथून 5 ते 10 गोण्या गुटखा मागवून विकायला सुरुवात केली. त्याचवेळी तो राजनिवास’च्या नजरेत आला. आणि पाहता-पाहता दिलीप बादलानी हा मराठवाड्यातील जळगाव ते नांदेडपर्यंत ‘राज निवासाचा’ प्रमुख डीलर बनला. दिलीप बादलानीचा एक पार्टनर असून त्याचे नाव राकेश भाटेजा उर्फ बब्बू असे आहे. त्याचा हा गुटखा महालक्ष्मी टॉन्सपोर्टमधून येतो. या टॉन्सपोर्टचा मालक सतीश शर्मा आहे.
कसे आहे दिलीप बदलानीचे नेटवर्क?
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप बादलानीचे गुटखा वितरणाचे नेटवर्क जबरदस्त आहे. सद्या त्याने नाशिक जिल्ह्यातील राज निवास’ची जबाबदारी घेतली असून सुनील अमृतकर त्याचे नाशिक मधील काम पाहतो. दिलीप बादलानीचे गुटख्याचे कामकाज सांभाळणारे प्रत्येक जिल्ह्यात सब डीलर आहेत. यामध्ये बीडमध्ये आबा मुळे, परळीमध्ये गफ्फार, माजलगावमध्ये कदम, गंगाखेडमध्ये नीरज साखरे, नांदेडमध्ये मोईन, लातूरमध्ये अजहर, जिंतूरमध्ये संदीप लाकडे, हिंगोलीमध्ये राजू अग्रवाल आणि बांगर, औरंगाबादमध्ये नदीम, जालनामध्ये लाला (यांचे एमआयडीसीत स्वतःचे गोदाम आहे.) मंठामध्ये सेलू अक्षय भंडारी, पाथरीमध्ये अवेज, हिमायत नगरमध्ये रिझवान अशी यांची नावे असल्याचे समझते. गुटख्याच्या जीवावर दिलीप बादलानी याने कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली आहे. जळगाव एमआयडीसीमध्ये त्याची फर्टिलायझर कंपनी आहे. सध्या तो जळगाव मुंबई हायवेवर रिलायन्स पेट्रोलपंपासमोर एक हॉटेल बांधत आहे. दिलीप बादलानी याच्या नावे परळी वैजनाथमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात माजलगाव पोलीस ठाणे, बीड पोलीस ठाणे परभणीतील गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. औरंगाबाद पोलीस ठाण्यात तर त्याच्या नावे (3) गुन्हे नोंद आहेत.
दिलीप रमेश बदलानीचे मराठवाड्यात कसे होते वितरण?
दिलीप रमेश बदलानीचे गुटखा वितरणाचे नेटवर्क जबरदस्त आहे. सद्या त्याने नाशिक जिल्ह्यातील राज निवास’ची जबाबदारी घेतली असून सुनील अमृतकर त्याचे नाशिक मधील काम पाहतो. दिलीप बादलानीचे गुटख्याचे कामकाज सांभाळणारे प्रत्येक जिल्ह्यात सब डीलर आहेत. यामध्ये बीडमध्ये आबा मुळे, परळीमध्ये गफ्फार, माजलगावमध्ये कदम, गंगाखेडमध्ये नीरज साखरे, नांदेडमध्ये मोईन, लातूरमध्ये अजहर, जिंतूरमध्ये संदीप लाकडे, हिंगोलीमध्ये राजू अग्रवाल आणि बांगर, औरंगाबादमध्ये नदीम, जालनामध्ये लाला (यांचे एमआयडीसीत स्वतःचे गोदाम आहे.) मंठामध्ये सेलू अक्षय भंडारी, पाथरीमध्ये अवेज, हिमायत नगरमध्ये रिझवान अशी यांची नावे असल्याची सुत्रांची माहिती आहे.