अपूर्वा नेमळेकर
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. सध्या अपूर्वा ही ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मुख्य भूमिका साकारत आहे. तर अपूर्वा ही नकारात्मक पात्र साकारताना दिसत आहे. नुकतंच अपूर्वाने तेजश्री प्रधानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेने टेलिव्हिजन टीआरपीमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. या मालिकेनं ‘ठरलं तर मग’, ‘आई कुठे काय करते’ अशा लोकप्रिय मालिकांना मागे टाकलं आहे. यानिमित्ताने नुकतंच अपूर्वा नेमळेकरने टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तेजश्री प्रधानबरोबर काम करण्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने भाष्य केले. मी आणि तेजू गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करत आहोत. त्यामुळे जेव्हा आम्ही एकत्र काम करायचं ठरवलं, तेव्हा मला कोणतीही असुरक्षितता किंवा मत्सर वाटला नाही.
