प्रतिनिधी, मुंबई
गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आणि टाळ-मृदुंग वाजवीत चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात रवाना झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नमो एक्स्प्रेस’ला दादर रेल्वे स्थानकात हिरवा झेंडा दाखविला. मुंबई भाजपतर्फे गणेशभक्तांसाठी खास नमो आणि मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन नमो एक्स्प्रेसमधून 3600 प्रवासी शनिवारी रात्री कोकणात रवाना झाले. कोकणवासीयांसाठी एकूण सहा रेल्वेगाडया आणि 238 बसगाडया सोडण्यात येत आहेत. कोकणवासीयांना हा प्रवास पूर्णपणे मोफत असून, प्रवासादरम्यान एक वेळचे जेवणही देण्यात येत आहे. या वेळी मुंबई भाजप अध्यक्ष आ. आशीष शेलार, कॅबिनेट मंत्री अॅड. मंगलप्रभात लोढा, आ. मिहिर कोटेचा, सरचिटणीस संजय उपाध्याय, मुंबई भाजप सचिव प्रतीक कर्पे उपस्थित होते.