प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत करत असतो. त्यासाठी त्या भूमिकेचा अभ्यासही तो करतो. वेळ प्रसंगी तो खर्या आयुष्यात त्या भूमिकेसारखाच राहण्याचा प्रयत्न करतो. सध्या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनुजा साठे हिची चर्चा रंगली आहे. एक थी बेगम या सीरिजमुळे अनुजा प्रचंड लोकप्रिय झाली. मात्र, तिने साकारलेल्या भूमिकेचा अभ्यास करत असताना तिला थक्क करणारा अनुभव आला. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने एका बारबालेला भेटल्यानंतर त्यांचं जीवन किती भयान असतं हे सांगितलं. मला ते वातावरण कळावं यासाठी पोलिसांकडून सगळी परवानगी घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो. ते मला म्हणाले तू इथे कोणाशीही बोल. तिथल्या बारबालेशी मी जवळपास 1 तास गप्पा मारल्या. मी तिला जनरल प्रश्न विचारले. इथे कशी आलीस वगैरे. म्हणजे मला ते सुद्धा विचारायचं नव्हतं. कारण, कोण कोणत्या परिस्थितीमुळे तिथे आलंय हे खूप भयानक असू शकतं.