📰 MUMBAI MITRA EXPOSE
———–
मुख्यमंत्र्यांच्या सुचने नंतरही मुंबईतील कचऱ्याचा प्रश्न ‘जैसे थे’
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
कचराकुंड्यांची परिस्थीती आज ही तशीच असल्याचे चित्र मुंबईत दिसून येत आहे. याबाबतीत ‘दै. मुंबई मित्र’ मुख्यमंत्र्यांच्या कडक सूचना असतानाही पालिकेने कचरा स्पॉटमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप स्थानिक नागरीकांनी केला आहे. मुंबईकरांचा आरोप आहे की पालिकेचे प्रतिक्रियांशिवाय दुसरे कोणतेही प्रयत्न काही नसतात आणि कचरा साचत राहतो. आज ही सांताक्रुज येथील रस्त्यांवर तसेच खार येथील आतील रस्त्यांवर कचरा असल्याचे चित्र आहे. तसेच वर्सोवा येथील केंद्रीय मात्स्यिकी शिक्षा संस्थान रस्त्यांवर कचऱ्याचे सामराज्य आहे.
वांद्रे आणि खारमधील आलिशान सोसायट्यांमध्ये स्वत:चे सफाई कामगार आणि कचरा उचलणारे कामगार आहेत जे कचरा वेगळे करतात पण या भागात गल्लीबोळात कोपऱ्यांवर कचरा दिसतो. खार आणि सांताक्रूझ परिसरातील कचरा आणि डेब्रिजबाबत अनेक रहिवाशांच्या तक्रारी आहेत. वांद्रे-खार-सांताक्रूझची सुध्दा सारखीच परिस्थिती आहे. एक दिवस कचरा साफ केला जातो पुन्हा दुसऱ्यादिवशी सारखीच परिस्थिती असते. अनेकवेळा आठवडा होऊनही येथे कचरा तसाच पडून असतो.
सफाई कामगार फक्त ओला कचरा गोळा करतात. साकीनाका येथील रहिवाशांनी कचराकुंड्यांबाबत सातत्याने तक्रारी केल्या. झोपडपट्टीतील कचरा उचलण्यासाठी पालिका आपली यंत्रणा का सुधारू शकत नाही? नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ करावा अशी अपेक्षा महानगरपालिका कशी करू शकते, असा सवाल साकीनाका येथील रहिवाशांनी केला आहे.
पालिकेने कचरा गोळा करण्याच्या विविध पद्धती आणल्या पाहिजेत. रात्रीच्या वेळी कचरा गोळा करणे आणि वाहून नेणे ही एक चांगली पध्दत आहे. ‘डेब्रिज ऑन कॉल’ सेवा हा प्रयोग ही चांगला असल्याचे रहिवाशांचे मत आहे.
