📰 MUMBAI MITRA EXPOSE
———–
◆ ड्रग क्विन बेबी पाटणकरचा व्यापाऱ्याला दोन कोटींचा गंडा
◆ कस्टममध्ये पकडण्यात आलेले सोने स्वस्तात देतो सांगून केली फसवणूक
◆ पाटणकर आणि तिच्या साथीदारावर वरळी पोलिस ठाण्यात कलम 420 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
ड्रग क्वीन शशिकला पाटणकर उर्फ बेबी पाटणकरचा नवा कारनामा समोर आला आहे. काही वर्षांपूर्वी ड्रग्सच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या बेबी पाटणकरने आपल्या साथीदाराच्या मदतीने एका व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचं समोर आले आहे. किरीट चौहान या व्यापाऱ्याची बेबी पाटणकरने दोन कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणुकीप्रकरणी बेबी पाटणकर आणि तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रग्स तस्करीनंतर बेबी पाटणकरचा आता फसवणुकीचा धंदा समोर आला आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी ड्रग्सच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या बेबी पाटणकरच्या कुकर्म अजून काही थांबली नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आपल्या साथीदाराच्या मदतीनं बेबीनं एका व्यापाऱ्याला थोडं थोडकं नव्हे तर तब्बल दोन कोटींना फसवले आहे. किरीट चौहान नावाच्या व्यापाऱ्याची स्वस्तात सोने देतो असे सांगून केली दोन कोटींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी बेबी पाटणकर आणि तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काही वर्षांपूर्वी ड्रग्सच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेली शशिकला पाटणकर उर्फ बेबी पाटणकर उर्फ बबी आंटी ही आता एका फसवणुकीच्या प्रकारात चर्चेत आली आहे. कस्टममध्ये पकडण्यात आलेलं सोने स्वस्तात देतो सांगून पाटणकर आणि तिच्या साथीदाराने एका व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे. तक्रारदार किरीट सुरेश चौहान या 60 वर्षीय व्यापाऱ्याने दोन कोटी रूपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. चौहान यांच्या तक्रारीवरुन वरळी पोलिसांनी भादवी कलम 420 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
