📰 MUMBAI MITRA EMPACT
———–
◆ सोयतकला पोलिसांची धाडसी कारवाई
◆ मध्यप्रदेशमध्ये ४५ लाखांचा ‘राज निवास’ गुटखा पकडला!
◆ 54 लाखांचा जिएसटी वसूल
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई:
‘मुंबई मित्र’ने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन गुटखा’ मोहिमेनंतर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर जागोजागी गुटखा पकडला जात आहे. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटकमधून महाराष्ट्रात गुटखा येत असतो. महाराष्ट्र पोलीस दै. मुंबई मित्र च्या मोहिमेमुळे बन्याच प्रमाणात सतर्क झाले आहेतच, शिवाय ‘दै. मुंबई मित्र च्या कारीची गुजरातच्या मुखमंत्र्यांनी गंभीर दाखल घेतली आहे. वाशा आशयाचे पत्रही गुजरात मुख्यमंत्री कार्यलयाने दै. मुंबई मित्र’ला पाठविल्याचा वृतांत यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आला. आता नुकताच मध्य प्रदेश पोलिसांनी ‘राज निवास गुटख्याचा सुमारे ४५ लाखांचा माल पकडला. मध्य प्रदेशचा इंदोर कोटा राष्ट्रीय महामार्गावर सोयतकला परिसरात नाकाबंदी दरम्यान हा गुटख्याचा कंटेनर मध्यप्रदेश पोलिसांनी नुकताच पकडला. त्याबद्दल त्यांची सर्वत्र स्तुती होत आहे. पोलीस सूत्रांनुसार मध्य प्रदेश सरकार भोपा पोलीस मुख्यालय आणि राज्य निवaणूक आयोगाच्या देखरेखीखाली एक संयुक्त अभियान सुरू आहे. या अभियानात मध्यप्रदेशमध्ये बाहेरून येणाऱ्या आणि आतून बाहेर जाणाऱ्या गाड्यांची कडेकोट तपासणी सुरू आहे. इंदोर कोटा राष्ट्रीय महामार्गावरील सोयतकला विभागात पोलिसांची कठोर नाकाबंदी सुरू आहे. नुकताच एक संशयास्पद कंटेनर पोलिसांनी थांबवला. त्यानंतर हा कंटेनर उघडला असता त्यामध्ये १६८ गोळ्या सापल्या. या गोण्यांमध्ये राजनिवास पान मसाला गुटख्याचे पाऊच आढळले. हा गुटखा सुमारे ४५ लाख रुपये किमतीचा आहे.
कंटेनर चालकाकडे पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केली. परंतु त्याच्याकडे कोणतेही कागपत्रे आवळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी कंटेनरसह चालकाला सोयतकला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. करचोरीचे प्रकरण असल्याने याप्रकरणाची शाजापूर जीएसटी विभागाला कळविण्यात आले. जीएसटीचे सहाय्यक आयुक्त कमलसिंह गर्जरच्या टीमद्वारे सदर मालाचे आकलन करण्यात आले. त्यावेळी ‘राज निवास’चे पाच रुपये दहा रुपये – किमतीचे पान मसाला, जर्दाचे पाऊच सापडले. त्यानंतर अंदाजे ४५ लाख रुपये किमतीच्या गुटख्यावर ५४ लाख ७ हजार ६४० रुपयांचा जीएसटी कर वसूल करण्यात आला व ही क्षम मध्यप्रदेश सरकारच्या खजिन्यात जमा करण्यात आली. कारण गुटखाबंदी महाराष्ट्रात आहे. परंतु मध्यप्रदेशमध्ये सोयतकला पोलीस ठाण्याचे प्रभारी यशवंतराव गायकवाड यांनी याप्रकरणी
अधिक तपास केला असता ‘राजनिवास’ गुटखा राजस्थानातून महाराष्ट्रात नेला जात होता.
अधिक तपास केला असता ‘राजनिवास’ गुटखा राजस्थानातून महाराष्ट्रात नेला जात होता.
पोलीस अधीक्षक संतोष कोरी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निशा रेड्डी आणि सूसनेर विभागाच्या एसडीओपी पल्लवी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यप्रदेशमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजस्थान सीमेवर बाहेरून मध्यप्रदेशमध्ये येणाऱ्या वाहनांची कडेलोट तपासणी करण्याचे अभियान सुरू आहे.
या अभियानांतर्गत सोयतकला पोलिसांद्वारे जीएसटी विभागासह गुटख्यावर संयुक्त कारवाई करण्यात आली. ही कारवाई सोयतकला पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक यशवंतराव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र नागर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुमेरसिंह मीना,पोलीस हवालदार संदीप डांगी , हेमंत पराशर, शिपाई प्रेम कुशवाह, दुर्गाप्रसाद पांचाल यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले असून या पथकाला पुरस्कार देण्याची घोषणाही केली आहे. त्याचप्रमाणे सामान्यांमध्येही पोलिसांच्या या कारवाईबद्दल स्तुतीचा वर्षाव केला जात आहे.