📰 MUMBAI MITRA EMPACT
————-
◆ गुजरातमध्ये पकडला लाखो रुपयांचा ‘दिलबाग’, ‘सिग्नेचर’ गुटखा
◆ ‘दै. मुंबई मित्र’ ची ‘गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन गृह आणि आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना गुटखा विरोधी कठोर कारवाई करण्याचे दिले होते आदेश!
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
गुजरात पोलिसांनी आज सायंकाळी केलेल्या धाडसी कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला. गांधीनगर येथील दामोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत ‘दिलबाग’, ‘सिग्नेचर’ गुटखा जप्त करण्यात आला. गुटख्याच्या ट्रकमध्ये अल्युमिनियम आणि प्लास्टिक असल्याचे भासविण्यासाठी बनावट बिल बनविणाऱ्या गुटखा तस्करांचा प्रयत्न गुजरात पोलिसांनी उधळून लावला.
विशेष म्हणजे ‘दै. मुंबई मित्र’ची ‘गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन गृह आणि आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना गुटखा विरोधी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तशा आशयाचे पात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून ‘दै. मुंबई मित्र’ला पाठविले होते. यासंबंधी सविस्तर वृत्त यापूर्वीच ‘दै. मुंबई मित्र’ने प्रसिद्ध केले होते. पोलीस सूत्रांनुसार, आज संध्याकाळी गुजरातमधील गांधीनगर स्थित दामोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुजरात-मुंबई महामार्गावर पोलिसांनी एक संशयास्पद ट्रक (क्र. एच.पी ३८ सी-३४६८) थांबविला. ट्रक चालकाकडे ट्रकमधील मालाबाबत विचारले असता अल्युमिनियम कॉइल आणि प्लास्टिक लॅमिनेशन असल्याचे त्याने सांगितले. या मालाचे १५ लाखांचे बिलही त्याने दाखवले. मात्र तरीही पोलिसांना संशय वाटून त्यांनी ट्रक उघडला असता आतमध्ये ‘दिलबाग’ आणि ‘सिग्नेचर’ या गुटख्याचा लाखो रुपयांचा माल आढळला. ट्रक चालकाला दामोदा पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. सूत्रांच्या माध्यमातून असे कळते की, दिल्लीवरून रवाना झालेला हा गुटख्याचा ट्रक मुंबईसाठी येत होता. हा सर्व माल गुटखा तस्कर शफी शेख याचा असल्याचेही कळते.