📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
—–
◆ ‘दै.मुंबई मित्र’ने’ स्टिंग ऑपरेशन प्रकरण
◆ पालघर पोलिसांनी केलेल्या कारवाईची सर्वत्र स्तुती
◆ पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे कौतुक
——
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पालघर पोलिसांच्या मदतीने ‘दै.मुंबई मित्र’ने’केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सुमारे 1 कोटी रुपयांचा गुटख्याचा ट्रक पकडण्यात आला. पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या डॅशिंग अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली पालघर पोलिसांनी केलेल्या या कारवाईची सर्वत्र स्तुती केली जात आहे. मात्र पोलिसांनी धाडसाने केलेली ही कारवाई अखेरपर्यंत तडीस न्यावी आणि घटकः तस्करांना चांगली अद्दल घडावी, अशा अपेक्षा जनतेतर्फे व्यक्त केल्या जात आहेत. कारण गुटख्याची केस कमकुवात करण्यासाठी आणि या प्रकरणातून स्वतःची कातडी वाचविण्यासाठी गुटखा तस्कर आकाश पातळ एक करत असल्याची माहिती सूत्रांच्या आधारे ‘दै. मुंबई मित्र’ला मिळाली आहे.
9 सप्टेंबर 2023 रोजी मध्यरात्री पालघर पोलिसांनी धाडसी कारवाई करत मुंबई-अहमदाबाद हायवेवर मनोर चिल्लर फाटा येथे राज निवास गुटख्याचा ट्रक पकडला. राजस्थानहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या या ट्रकमध्ये सुमारे 1 कोटी 11 लाखांचा मुद्देमाल सापडला. मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येऊन ट्रक चालक अमरसिंग रामजीलाल यादव याला अटक करण्यात आली असून याप्रकरणी ट्रक मालक मे. पुना. बेंगलोर रोडवेज कंपनी, गुटखा तस्कर श्रीनाथ सिंग, रामविलास यादव, विकास गुप्ता, शिवप्रकाश उर्फ आशु गुप्ता, इब्राहिम यासिन पटेल, राजेश वाला या फरारी आरोपींचा शोध पालघर पोलीस घेत आहेत. पालघर पोलिसांच्या या धाडसी कारवाईबद्दल विशेषतः पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ज्या तळमळीने जातीने लक्ष घालून ही कारवाई यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्याबद्दल जनतेमध्ये स्तुती सुमने उधळली जात आहेत. मात्र,पोलिसांनी हे प्रकरण अखेरपर्यंत यशस्वीरित्या तडीस नेऊन गुटखा तस्करांना कठोर शिक्षा होतील, हे पाहण्यासाठी प्रयत्न करण्याची मोठी जबाबदारी पालघर पोलिसांवर आहे. जनतेच्या पोलिसांकडून याच अपेक्षा आहेत.
