प्रतिनिधी, मुंबई
येत्या 30 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सरुवात होणार असून 17 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यंदा पाकिस्तान या स्पर्धेंचं आयोजन करतंय. हायब्रीड मॉडेलवर ही स्पर्धा होत असून काही सामने पाकिस्तानात तर काही सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळदरम्यान मुलतानमध्ये खेळवला जाणार आहे. पण स्पर्धा सुरु होण्याआधीच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. एशिया कप स्पर्धेवर करोनाचे सावट पसरले आहे.
स्पर्धेवर करोनाचे सावट
एशिया कप स्पर्धेला काही दिवसांचा अवधी बाकी असतानाच श्रीलंकेतून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रीलंका क्रिकेट संघाचे दोन खेळाडूंचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सलामीचा फलंदाज अविष्का फर्नांडो आणि विकेटकिपर-फलंदाज कुसल परेरा या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. अत्यंत महत्त्वाची स्पर्धा असल्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.