टोकियो
जपान इंडस्ट्रियल पार्टनर्स (जेआयपी)च्या नेतृत्वातील एक समूह तोशिबा कॉर्पला विकत घेण्याचा विचार करत आहे. यासाठी कंपनीची किंमत २.४ लाख कोटी येन म्हणजेच सुमारे १.३३ लाख कोटी रुपये ठरवण्यात आली आहे. या मूल्यांकनानुसार, हा संभाव्य करार या वर्षातील आशियातील सर्वात मोठा टेकओव्हर असेल. तोशिबा सध्या भांडवली संकटाचा सामना करत आहे. तोशिबा हा जपानमधील सर्वात मोठा औद्योगिक समूह आहे. भारतात ही कंपनी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आणि वैद्यकीय उपकरणे यासारख्या उत्पादनांचा व्यवसाय करते. जेआयपी-नेतृत्वाखालील गट त्यासाठी पसंतीचा बोलीदार म्हणून उदयास आला. समूहाने तोशिबाला १ लाख कोटी येन (५६ हजार कोटी रुपये) रोख स्वरूपात खरेदी करण्याचा आणि उर्वरित बँकांकडून वित्तपुरवठा करण्याचा प्रस्ताव ठेवला. तोशिबाला ११ हजार कोटी रुपयांहून अधिकचे खेळते भांडवलही दिले जाईल, असे या सौद्याशी संबंधित सूत्रांनी सांगितले. १४७ वर्षे जुनी आहे तोशिबा कंपनी : तनाका हिसाशिंजे आणि इशिसुके फुजिओका यांनी तोशिबाची स्थापना १८७५ मध्ये केली होती. १.३% घसरले तोशिबाचे शेअर टोकियोमध्ये मंगळवारी तोशिबाचे शेअर्स जवळपास १.३% घसरले. त्यानुसार कंपनीचे बाजारमूल्य सुमारे १.२९ लाख कोटी रुपये ठरले. कंपनीला १.३३ लाख कोटी रुपयांच्या बोलीच्या तुलनेत ३,०८२ रुपये शेअरची किंमत मोजावी लागणार आहे. सोमवारी शेअरच्या बंद भावाच्या