मुंबई
मुंबईत सद्यस्थितीत झोपडपट्टीतील २४ हजार घरांतील १ लाख २३ हजार रहिवासी कंटेनमेंट झोनमध्ये आहेत. १२८ सील इमारतीमधील १८ हजार घरांमधील ६८ हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत. ३०२० सील मजल्यांमधील १ लाख ३९ हजार घरांमधील ५ लाख १३ हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत. त्यामुळे मुंबईतील तब्बल सात लाखांहून अधिक रहिवासी निर्बंधांच्या कचाट्यात अडकले आहेत.