अंबरनाथ:
प्रतिनिधी :-भोलेनाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ? अशा बालगीतामधील गमतीचा भाग सोडला तर गणित या विषयाची नावड ही आवडीत कशी रूपांतरित करता येईल, इतक्या सोप्या पद्धतीने मांडणी करून विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी अंबरनाथ येथील एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयात डिजिटल ‘गणिताची प्रयोगशाळा’ उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचे रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणितदिन डॉ. विवेकानंद वडके यांच्या हस्ते या गणित कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. 1977 सालच्या माजी विद्यार्थ्यांनी ही अनोखी ‘गुरुदक्षिणा’ शाळेला दिली आहे.
बॉक्स
गणिताची गोडी लावण्यासाठी प्राथमिक स्तरापासून प्रयत्न केले जावेत-
डॉ. विवेकानंद वडके*- विद्यार्थिदशेत ठरणारा विषय म्हणून कधी त्या विषयाचा उल्लेख होतो पण याच विषयाची जर प्राथमिक शाळेपासून गोडी लागली तर कधी आपली गणिताशी गट्टी जमते ते कळतही नाही हीच संकल्पना मनात घेऊन या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी ही गणिताची प्रयोगशाळा उभारून स्तुत्य उपक्रम साकारल्याचा मनोदय डॉ. विवेकानंद वडके यांनी यावेळी व्यक्त केला.*
*महात्मा गांधी विद्यालय विद्यालयातील 1977 च्या दहावीच्या बॅचचे नुकतेच स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनामध्ये महात्मा गांधी गांधी शाळेमध्ये ‘गणित कक्ष’ उभारण्याची संकल्पना पुढे आली होती. या संकल्पनेतून माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेमध्ये डिजिटल ‘गणिताची प्रयोगशाळा’ साकारली आहे.आपले सहाध्यायी व गणितात अत्यंत हुशार असलेले आपले मित्र कै. भरत करमरकर यांच्या स्मरणार्थ काही करावे हे ठरले. विद्यार्थ्यांनी गणिताशी मैत्री करावी, वेगवेगळ्या क्लुप्त्या आत्मसात कराव्या यासाठी हे सर्व माजी विद्यार्थी पुढे सरसावले आणि आपल्या शिक्षकांच्या प्रति असलेलं प्रेम व्यक्त करत, त्यांचे शिक्षक पी. के. चौधरी यांच्या नावाने महात्मा गांधी विद्यालयात ‘गणित कक्ष’ साकारला आहे. यावेळी स्नेहल करमरकर यांनी आपल्या पतीबद्दल त्यांच्या वर्ग सहकाऱ्यांनी जे कार्य केले त्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच गणित शिक्षक पुरुषोत्तम चौधरी यांनी शिक्षक सेवेत असताना शाळेच्या आणि विद्यार्थी यांच्याबद्दल अनेक आठवणीना उजाळा देताना, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करावे असे सांगितले. या कार्यक्रमाला स्नेहल करमरकर, चौधरी कुटुंबीय, माजी विद्यार्थी शेखर महाजन, कविश नाईक, प्रशांत खानविलकर, संध्या नेहेते, मिलिंद चौधरी,रवींद्र वारंग, इनरव्हील क्लबच्या अंजली वारके, संध्या जोशी यांच्यासह संस्थेचे सुधींद्र शूरपाली, डॉ. श्रीकृष्ण पाटगावकर, पदाधिकारी, संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.या गणित कक्षाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अनिल सोनावणे, तुषार सोनजे, पंकज भालेराव यांनी गणित कक्षातील विविध साहित्य व प्रमेय याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भणगे तरआभार प्रदर्शन मुख्याध्यापक डॉ. बाळासाहेब गायकवाड यांनी केले.