मुंबई
राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आहे. सोमवारी 518 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. असे असले तरी ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचे 10 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.
गेल्या काही दिवसात 1 हजारांहून कमी रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या घट झाली आहे. आज राज्यातील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद आहे. आज 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 811 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.72 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
राज्यात 518 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 39 हजार 296 वर पोहोचला आहे. तर आज 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 41 हजार 175 वर पोहोचला आहे. आज 811 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 87 हजार 593 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.72 टक्के आहे. तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 61 लाख 56 हजार 544 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.04 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 78 हजार 801 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहे. 6 हजार 853 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
प्रत्येक विभागातील रुग्णसंख्या
मुंबई महापालिका – 163
ठाणे पालिका – 31
नवी मुंबई पालिका – 27
कल्याण डोबिवली पालिका – 16
वसई विरार पालिका – 21
नाशिक पालिका – 16
अहमदनगर – 27
अहमदनगर पालिका – 11
पुणे – 30
पुणे पालिका – 39
पिंपरी चिंचवड पालिका – 15