मुंबई –
मुंबईत गेले पावणे दोन वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनाचा प्रसार आणि मृत्यू रोखण्यासाठी पालिका प्रशासन सतत प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार व रुग्णसंख्या आटोक्यात आहे. बुधवारी 108 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही महिन्यातील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद आहे. आज 4 मृत्यूंची नोंद झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 2780 इतका आहे.
मुंबईत गेल्या वर्षी 11 मार्चला पहिला रुग्ण आढळून आला. 17 मार्चला मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाला. तेव्हापासून आतापर्यंत गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार आटोक्यात असल्याने आज (बुधवारी) 108 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 62 हजार 989 वर पोहचला आहे. आज 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण 16 हजार 340 मृत्यूंची नोंद झाली आहे. 215 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 7 लाख 42 हजार 176 झाली आहे.