मुंबई
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओसरल्यानंतर, दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या थायलंड किनाऱ्यावर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील काही दिवसांत याचं चक्रिवादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाचही दिवस अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याने आज पुण्यासह एकूण 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील 3-4 तासांत संबंधित जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील पाच दिवस कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची हीच स्थिती कायम राहणार आहे.
अंदमानच्या समुद्रात नवीन संकट उभ ठाकलं आहे. परिणामी हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालं असून पुढील २४ तासांत याची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांसाठी राज्यात विविध ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १५ ते १८ नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, कोकण, मध्य महाराष्ट्र, संलग्न मराठवाड्यात पाऊस होऊ शकतो. तर काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरच्या आसपास पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच दक्षिण महाराष्ट्र गोवा किनारी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.
