अहमदनगर
अहमदनगरमध्ये लॉजवर छापा टाकून पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. छापेमारीत दोन तरुणींची सुटका करण्यात आली, तर दोघा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अहमदनगरमधील वाकोडी फाटा भागात असलेल्या ङ्गसनराईज लॉजिंगफमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने काल रात्री ही कारवाई केली. कारवाई दरम्यान पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली. या प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरमध्ये राहणार्या 27 वर्षीय प्रकाश धनाजी सपकाळ आणि 27 वर्षीय रामेश्वर आप्पासाहेब पाटील यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी स्त्रिया आणि मुली यांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3.4.5.7.8 प्रमाणे भिगार कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये एकत्र राहणे गुन्हा नाही, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिला होता. परंतु परस्पर संमतीने अशा जोडप्याने एकत्र राहणं कायदेसंमत आहे.




