नगर
उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे आज (ता.18) सकाळी राहत्या घराचा जवळून अपहरण झाले. चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिव्हॉल्व्हरचा धाकाने त्यांना एका गाडीत धरुन बसविले, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांकडून हुंडेकरी यांचा शोध सुरू आहे.
हुंडेकरी हे सकाळी घराबाहेर पडलेले असताना त्यांच्या पाळतीवर असलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांना पकडले. त्यानंतर एका गाडीत घालून पळवून नेले. हुंडेकरी यांनी सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु उपयोग झाला नाही. अपहरणकर्त्यांच्या तोंडाला मास्क बांधले होते, असे प्रत्यक्षदर्शी असलेल्या स्थानिक महिलांचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांना एका संशयिताची माहिती मिळाली असून हुंडेकरी यांचा शोध सुरू आहे.