अहमदनगर : नगर-दौड महामार्गावरील नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद परिसरात रात्री अडीचच्या सुमारास ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चौघे जण जागीच ठार झाले असून यातील तिघे नगरमधील भिंगार व एक जण वाळकी येथील आहे. अपघातग्रस्त कार श्रीगोंदयाहून नगरकडे येत होती. बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्ती जवळ हा अपघात झाला. भरधाव कार पाठीमागून ट्रकला धडकली. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी जखमींना मदत करण्यासाठी धाव घेतली. अपघातग्रस्तांना सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले.