प्रतिनिधी
पुणे
घरात मोठा दोष असून तो घालविण्यासाठी उंटाचा बळी द्यावा लागेल, अशी बतावणी करुन महिलेची तब्बल दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
फसवणूक करणार्या तिघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कोंढ़वा येथे राहणार्या 24 वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मोहम्मद सिद्दिकी याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व आरोपी सिद्दीकी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.